भडने येथील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा
![]()

भडने येथील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे रिक्षाचालक व उपसरपंच भाऊसाहेब राजाराम पाटील यांच्या मालकीचे रिक्षाने भडणे येथे शिंदखेडा हून पाच व्यक्ती साखरपुडा आटपून घरी येत असताना गाडीत एका व्यक्तीच्या मोबाईल पडलेचे रिक्षा चालकास दीसुन आला मोबाईल सापडल्याने या बाबत चौकशी केली असता कुठूनही तपास मिळून आलेला नव्हता याबाबत भडणेतील पोलीस पाटील युवराज माळी यांच्याशी संपर्क साधून सदर मोबाईल पोलीस पाटील यांच्या स्वाधीन केला सदर पोलीस पाटलांनी शहानिशा करून गावातील एका व्यक्तीचा मोबाईल हरवला याबाबत वार्ता पसरली सदर मोबाईल हा अँड्रॉइड वीस हजार रुपयांचा होता मात्र त्याला लॉक असल्यामुळे संपर्क साधता येऊ शकत नव्हता सर्व गोष्टीच्या तपास करून रिक्षामध्ये कोण व्यक्ती आले गावात तपास केला असता त्या पाच व्यक्तींच्या मधून एका भीमा मोरे यांचा मोबाईल हरवल्याबाबत माहिती मिळताच रिक्षा चालक व भडणेतील उपसरपंच भाऊसाहेब पाटील यांनी सदर व्यक्तीला पोलीस पाटील युवराज माळी यांच्या समक्ष बोलून सदर मोबाईल परत केला त्यांच्या प्रामाणिकपणामुळे परिसरात कैतुक करण्यात येत आहे

