1 min read

महात्मा जोतिराव फुले नवयुवक मंडळ मुंबई यांच्या वतीने महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…..

Loading

महात्मा जोतिराव फुले नवयुवक मंडळ मुंबई यांच्या वतीने महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…..

” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा जोतिराव फुले यांना गुरू मानून समाजासाठी केलेल्या महान कार्यामुळे महामानव बनले. या दोन्ही महापुरुषांचे विचार आजच्या नवयुवकांना सदैव प्रेरणा देत राहतील “असे प्रतिपादन मुंबई माळी समाज मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश माळी सर यांनी महात्मा जोतिबा फुले नवयुवक मंडळ मुंबई यांच्या वतीने कल्याण येथील विकल्प अभिनय कार्यशाळा येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले. कार्यक्रमाची सुरूवात प्रा. प्रकाश माळी, नवयुवक मंडळाचे अध्यक्ष रुपेश महाजन व उपाध्यक्ष विकास महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली. यावेळी नवयुवक मंडळाचे सचिव भूषण महाजन, सदस्य तुषार महाजन व जितेन महाजन तसेच शुभम पवार, गायक राजू यशवंत व त्यांचे सहकारी यांनी प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहिली. या छोटेखानी कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विकास महाजन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *