1 min read

अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय , महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश

Loading

अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय , महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश
धुळे दि ,15
राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांवरील अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ करण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला असून याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिनांक 13 एप्रिल रोजी अधिकृत घोषणा केली असून राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेतर्फे अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ करण्याबाबत अनेक वर्षापासून सातत्यपूर्ण मागणी करण्यात आली होती. व त्यासाठी शासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून , निवेदन देऊन तसेच प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन या निर्णयासाठी प्रयत्न करण्यात आले होते. तात्कालीन शिक्षण मंत्री मा वर्षाताई गायकवाड यांच्याकडे याबाबत महाराष्ट्र टीचर असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला होता. त्याचप्रमाणे याबाबत दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी ग्रंथपाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी स्वतः हजर राहून तात्कालीन शिक्षण संचालक मा दिनकर टेमकर व मा महेश पालकर साहेब यांच्याशी बालभारती पुणे येथे महत्त्वपूर्ण बैठक घेऊन त्याच्यात अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ करण्याबाबत सविस्तर चर्चा करून येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यात आला होता. व त्यानुसार ज्या शाळांवर 1000 पटसंख्या असेल त्या शाळांवर पूर्णवेळ ग्रंथपालांची समायोजन करण्यात यावे, तसेच ज्या शाळांवर पटसंख्या कमी असेल अशा ठिकाणी दोन किंवा तीन शाळा मिळून एक ग्रंथपाल समायोजित करून त्याला पूर्ण वेळ करण्यात यावे असे राज्यध्यक्षा शुभांगी ताई पाटील यांनी सुचवले होते .याबाबत त्यावेळी तात्काळ निर्णय घेण्यात येऊन तसा प्रस्ताव शासनाकडे संचालकांकडून सादर करण्यात आला होता. व त्यावर आता शासना कडून आता निर्णय होऊन त्याच पद्धतीने शिक्षण विभागाने ग्रंथपालांचे पूर्णवेळ समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 1700 ग्रंथपाल अर्धवेळवरून पूर्ण वेळ होणार असून, सदरचा निर्णय हा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन व ग्रंथपाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्यपूर्ण व अभ्यास पूर्वक केलेल्या मांडणीचे व मागणीचे यश असून त्याबद्दल राज्यातील पूर्णवेळ होणाऱ्या सर्व ग्रंथपालांचे शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *