समाजाने दारूच्या व्यसनापासून तसेच बुवाबाजीपासून दूर राहावे – ह भ प पंकजपाल महाराज
![]()



समाजाने दारूच्या व्यसनापासून तसेच बुवाबाजीपासून दूर राहावे – ह भ प पंकजपाल महाराज
लासुर:- प्रत्येक समाजामध्ये व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाचा आहारी गेल्याने कुटुंबा ची परिस्थिती हलाखीची होते. व्यसनामुळे कुटुंबाची प्रगती खुंटते व समाजाच्या त्या परिवाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो यासाठी समाजाने व्यसनापासून दूर असायला पाहिजे,आपण महात्मा ज्योतिराव फुले यांचे वारसदार आहोत याचे भान प्रत्येक समाज बांधवांनी राखावे असे प्रतिपादन हभप पंकज पाल महाराज यांनी लासुर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात केले तसेच महिलांनी बुवा बाबांच्या नादी लागू नये ,श्रद्धा ठेवावी अंधश्रद्धेला बळी पडु नये , टीव्हीवरील संध्याकाळच्या सिरीयल पाहणे बंद करावे त्याच्यामुळे कुटुंबावर वाईट संस्कार होतात कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घेतली पाहिजे मुला मुलींना शिक्षित करून सुशील सुसंस्कृत करा आपली मुलगी वा मुलगा कुठे जातो याकडे लक्ष असू द्या असे सांगितले क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात ह भ प सत्यपाल महाराज यांचे शिष्य ह भ प पंकज पाल महाराज यांनी आपल्या कीर्तन सोहळ्यातून ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले.या कीर्तन सोहळ्याचे आयोजन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आले होते.
यावेळी प्रतिमा पूजन ह भ प पंकजपाल महाजन, क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ए के गंभीर सर, सचिव सुरेश पवार, माजी लोकनियुक्त सरपंच जनाताई माळी, श्रीराम मंदिर बांधकाम समिती अध्यक्ष हिम्मतराव महाजन, वि का सह सो सा चेअरमन सुरेश महाजन, माजी चेअरमन तुकाराम महाजन, नाटेश्वर पीक संरक्षण सो सा माजी चेअरमन गोकुळ माळी, सावता महाराज पतसंस्थेचे माजी चेअरमन गोविंद माळी, संचालक शंकर माळी, मासिक माळी भूषण चे संपादक भिमराव महाजन, यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती उत्सव समिती व समाज बांधव यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन सरस्वती क्लासेस चे संचालक विनोद महाजन सर यांनी व आभार श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी मानले.

