1 min read

देवगांव देवळी येथे संदीप पाटील याच्या निवडीबद्दल आईवडीलसह झाला सत्कार…

Loading

देवगांव देवळी येथे संदीप पाटील याच्या निवडीबद्दल आईवडीलसह झाला सत्कार…

अमळनेर प्रतिनिधी- जिद्द चिकाटी आत्मविश्वास राहिला तर आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.. आईवडिलांच्या बरोबरीने शेतीची काम करीत व अभ्यास जसा वेळ मिळेल तसा करत संदीप पाटील याने संधी शोधत संधीचे सोने केले व त्यांने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे असे देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या वतीने त्यांचा संदीप व त्याचे आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला तेव्हा शाळेचे देवगांव देवळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व राजेंद्र बिल्डिंग वर्कसचे मालक बाळूदादा पाटील यांनी सांगितले.
संदीपने पालघर जिल्हा पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत ५० पैकी ३८ व लेखी परीक्षेत १०० पैकी तब्बल ९६ गुण मिळवून आपल्या दमदार अभ्यासाच्या जोरावर पालघर जिल्हा पोलीस भरतीत यश संपादन केले आहे…
त्याच्या सत्कार प्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे शिक्षक ईश्वर महाजन ,सुरेश महाजन एच.ओ माळी व सावित्री फुले वाचनालयाचे ग्रंथपाल नरेंद्र पाटील उपस्थित होते.