1 min read

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हाच तळागाळातल्या सामान्य माणसाच्या चळवळीचा श्वास.
डॉ.मिलिंद बागुल

Loading

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हाच तळागाळातल्या सामान्य माणसाच्या चळवळीचा श्वास.
डॉ.मिलिंद बागुल

सामान्यातल्या सामान्य माणसांन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला ज्या पद्धतीने ज्या प्रकाराने आत्मसात केल त्यातून खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरत अन्यायाच्या विरुद्ध बंड करत कायदेशीर रित्या लढाई लढणारा सामान्यातला सामान्य माणसाचा श्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असल्याचे मत भीम रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल यांनी तक्षशिला बौद्ध विहार सोनी नगर पिंप्राळा यांनी आयोजित केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार चळवळीत खऱ्या अर्थाने जिवंतपणा आणणारा आणि ऊर्जा देणारा असून या विचारांनी प्रेरित होऊन वंचित, उपेक्षित, गोरगरीब जनतेने अनेकदा अन्यायी अत्याचारी जुलमी व्यवस्थेच्या विरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे हत्यार वापरत निसर्गदत्त अधिकारांची, हक्काची मागणी करत अनेकदा लढाई जिंकलेली आहे ही लढाई अस्तित्वाची स्वाभिमानाची आणि आत्मभानाची असणारी अशी असते यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचं योगदान महत्त्वाचे असल्याचे मत देखील त्यांनी याप्रसंगी मांडले.
प्रमुख अतिथी डॉ. सत्यजित साळवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनमानसाकरता केलेल्या कार्याचा आणि दिलेल्या योगदानाचा ऐतिहासिक संदर्भ देत मार्गदर्शन केले. सुमित्र अहिरे यांनी आपल्या मनोगतातून सद्यस्थितीतल्या भारतीय समाज व्यवस्थेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने विकासाचा टप्पा गाठता येईल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशाला या समाज व्यवस्थेच्या जडणघडणीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत त्यांनी मांडले. याप्रसंगी अनिल सुरडकर यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीस संगीताताई भालेराव, ज्योती निकम, सिंधुबाई जाधव, आशा सुरळके, प्रियंका सुरळकर, मीना हिवाळे, सोनाली सोनवणे, वंदना बांगर, भारती नन्नवरे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास विजयकुमार मौर्य अनिल सुरडकर व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद निकम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *