भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळा अमळनेर येथे उत्साहात साजरी
![]()

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळा अमळनेर उत्साहात साजरी
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत उत्साहात साजरी. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्कृष्ट चित्र रेखाटन केल्यामुळे कामाक्षी चौधरी व हेतल बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगला सोनवणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष कामाक्षी चौधरी, हेतल बाविस्कर, यांनी प्रतिमेचे पूजन केले. रमाईच्या वेशभूषेत तनिषा पवार आलेली होती. तनिष्का विनोद पाटील, दिशा जगदीश पाटील, विना लक्ष्मीकांत विसावे, काव्यांजली जालंधर चौधरी, कार्तिक प्रशांत पवार, ग्रीष्मा वासुदेव चौधरी, हर्षवर्धन प्रदीप कंखरे, लावण्या विनोद पाटील, हेमाक्षी विजय चौधरी, हिमांशू शिवाजी पाटील, देवश्री सतीश कागणे, स्नेहा प्रमोद शिंदे, गार्गी कैलास बोरसे, जानवी प्रकाश पाटील, प्राची लक्ष्मीकांत विसावे, कृष्णा महेंद्र पाटील, या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली. सौ सविता देशमुख यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या शालेय जीवनातील घटना सांगितली. सौ ललिता गवळी यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. सौ विजया गायकवाड यांनी स्त्रियांनी आत्मनिर्भय कसे व्हावे हे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शुभांगी कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापका सौ मंगला सोनवणे ,सौ विजया गायकवाड, सौ शुभांगी कुलकर्णी, सौ सविता देशमुख, श्रीमती ज्योतिर्मय बाविस्कर, श्रीमती ललिता गवळी, श्रीमती मनीषा गवते, श्रीमती रूपाली पवार, श्रीमती सुवर्णा पाटील, श्रीमती प्रियंका बाविस्कर, वासंती पाटील, श्रीमती दिपाली देसले, सौ प्राची ब्रम्हे, श्रीमती कविता भदाणे. व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होत्या.
मुख्याध्यापिका सो मंगला सोनवणे मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले कार्तिक प्रशांत पवार या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट भाषण दिल्याबद्दल पालक प्रकाश पाटील यांच्याकडून कौतुकास्पद बक्षीस देण्यात आले विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

