1 min read

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी

Loading

आज दिनांक 14/04/2023 रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्यात आली. तसेच पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या हस्ते समवेत ज्येष्ठ पालक श्री.किशोर वाकलेकर,श्री.सतिष पाटील ,मनिष किसन जाधव (मुख्याध्यापक) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी समवेत पालक यांना संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांच्याकडून स्कूल बॅग ,वाटर बॅग, टिफिन बॉक्स ,कंपास शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.समवेत श्री.रामकृष्ण शेलकर सर, श्री.जगदीश सोनवणे सर ,सौ.सविता पाटील,सौ.संगीता महाजन,सौ.वैशाली पाटील मॅडम होते. विद्यार्थी व पालकांना संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडून आईस्क्रीम वाटप करण्यात आली.तर नाश्ता दिपक पानसे यांचे वाढदिवस निमित्ताने देण्यात आला. शाळेतील रोशन पाटील व प्रधान बारेला या विद्यार्थ्यांनी आपले कला कौशल्य सादर केले.सौ.सविता पाटील मॅडम यांनी उत्कृष्ट अशी कविता सादर केली आणि उपस्थित पालकांनाही अश्रू अनावर झाले.पालकांना मार्गदर्शन व माहिती, हेमंत महाजन सर यांनी दिली. शिक्षक यांनी सर्व पालकांना दिशा अभियान अभ्यासक्रम,व रिपोर्ट कार्ड दाखवून पुढील मार्गदर्शन करण्यात आले.आजपासुन सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी देण्यात आली.सर्व विद्यार्थी खुप आनंदी होते.तर विद्यार्थी घरी जाताना… शाळेचे संस्थापक अध्यक्ष, विशेष शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मन भरून आलेले होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रताप पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन जगदीश सोनवणे यांनी केले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
🙏🙏🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *