डॉ बाबासाहेबांचे विचार देशाला महासत्ता बनवतील
मुख्याध्यापक अनिल महाजन
देवगाव देवळी हायस्कूल मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
![]()

डॉ बाबासाहेबांचे विचार देशाला महासत्ता बनवतील
मुख्याध्यापक अनिल महाजन
देवगाव देवळी हायस्कूल मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अमळनेर प्रतिनिधी-जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारच देशाला महासत्ता बनवतील असे मुख्याध्यापक अनिल महाजन मार्गदर्शन करतांना बोलत होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी केले.
तर अरविंद सोनटक्के म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला स्वतंत्र समता बंधुता व न्याय हि तत्वे दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घाला असे त्यांनी आजच्या तरुण पिढीला सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख ईश्वर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस.के महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काऊट शिक्षक एच.ओ माळी शिक्षकेतर कर्मचारी एन जी देशमुख संभाजी पाटील यांनी प्रयत्न केले.






