चेंबूर वाशी नाका येथील खान्देश मंडळाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी…..
![]()



चेंबूर वाशी नाका येथील खान्देश मंडळाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी…..
” दुःखी पीडितांचा दुःख हर्ता, विद्येचा तो महान दाता…तहानलेल्या जीवांचा तृप्त केला आत्मा, म्हणुनी नाव त्यांचे पडले महात्मा…” असे महात्मा फुलेंविषयी प्रशंसोद्गार प्रमुख पाहुणे प्रा.प्रकाश संतोष माळी अध्यक्ष श्री क्षत्रिय माळी समाज समाज सुधारणा मंडळ, मुंबई यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजविणारे, बहुजन समाजाचे उद्धारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सोसायटी हॉल शास्त्रीनगर, वाशी नाका, चेंबूर येथे खान्देश मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात केले. कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रीनगर सोसायटीचे अध्यक्ष सागर जामणिक, सचिव हरकसिंग, उपशाखा प्रमुख शैलेश वेल्हे यांच्यासह प्रमुख पाहुणे प्रा.प्रकाश संतोष माळी, प्रा.सुनिल भाऊलाल महाजन सहसचिव माळी समाज मंडळ मुंबई व रुपेश मुरलीधर महाजन अध्यक्ष नवयुवक मंडळ मुंबई तसेच जेष्ठ समाज बांधव श्रावण ओंकार लोखंडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून झाली. या प्रसंगी माळी समाजातील बंधू-भगिनींसोबत इतर समाजातील बंधू-भगिनींनी देखील महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शशिकांत मोतीलाल महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेश पंडीत लोखंडे, दिलीप भोजू महाजन, वसंत नथ्थू माळी, जगन्नाथ दयाराम माळी, शशिकांत मोतीलाल महाजन, विजय रामकृष्ण महाजन, प्रकाश आनंदा महाजन, ज्ञानेश्वर छबुलाल माळी, जितेंद्र छबुलाल माळी, रविंद्र छबुलाल माळी, समाधान गोकुळ महाजन, विक्रम भगवान महाजन, भूषण नामदेव महाजन, दिपक विश्राम माळी व भगवान दयाराम महाजन यांच्यासह सर्व युवक-युवतींनी व भगिनींनी विशेष मेहनत घेतली.

