जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देवगाव देवळी येथील संदीप पाटील यांचे स्वप्न झाले साकार…
![]()

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर संदीपचे स्वप्न झाले साकार ..।
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आयुष्यात यशोशिखरावर पोहोचण्यासाठी करत असलेल्या मेहनत व प्रयत्न या दोन शब्दांना जर का संयम या शब्दाची जोड मिळाली तर त्या व्यक्तीस यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही… याच गोष्टीची प्रचिती आपल्याला देवगांव देवळी गावात आज पाहण्यास मिळत आहे…
देवगाव देवळी येथील माजी उपसरपंच व कृषिभूषण अनिल वसंतराव पाटील यांना दोन मुले व एक मुलगी… काबाडकष्ट करत मुलांना उच्च विद्या विभूषित केले. मोठा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे तर हा लहान मुलगा संदीप.. यानेही संधीचे सोने केले..
लहान चिरंजीव संदीप अनिल पाटील अत्यंत काबाडकष्ट व शेतातील कामात वडिलांना पूर्णपणे सहकार्य करत आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. आणि अखेर त्याला पालघर जिल्हा पोलीस भरती त्यांने यश संपादन केले.
यात त्याला म्हणजे सतत मिळत असलेल्या अपयशाची मालिका खंडीत करत या तरुणाने पालघर जिल्हा पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत ५० पैकी ३८ व लेखी परीक्षेत १०० पैकी तब्बल ९६ गुण मिळवून आपल्या दमदार अभ्यासाच्या जोरावर पालघर जिल्हा पोलीस भरतीत यश संपादन केले आहे…
देवगाव देवळी गावात यशाची भरारी सुरूच
देवगाव देवळी तालुका अमळनेर हे अत्यंत 2000 लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये इयत्ता दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा असल्याने व पुढचे शिक्षण घेऊन पदवीधर होऊन अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तरुणाई कार्यरत आहे. तरुणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक विद्यार्थी शासकीय नोकरीमध्ये कार्यरत आहे यातच संदीप अनिल पाटील हा विद्यार्थी तरूणांना प्रेरणास्थान ठरेल यात शंका नाही व अजूनही काही विद्यार्थी विविध परीक्षांची तयारी करत आहेत त्यांनाही यश निश्चितच मिळेल असे बोलले जात आहे
संदीपला मार्गदर्शन त्याचे मामा किरण सुरसे महामार्ग पोलीस मुंबई यांचे मिळाले.
त्याच्या यशाचे अभिनंदन अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देवगांव देवळी हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव शांताराम पाटील,उपाध्यक्ष नवलदादा पाटील, व संचालक मंडळ, देवगांव देवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन व शिक्षकेतर कर्मचारी व देवगांव देवळी गावातील ग्रामस्थ मंडळ व मित्र परीवार यांनी केले.

