संप कालावधी अर्जित रजा मंजूर
राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक समन्वय समिती, शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
![]()

संप कालावधी अर्जित रजा मंजूर
(मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे)
राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक समन्वय समिती, शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
दि. १३ एप्रिल २०२३ –
जुन्या पेन्शनसाठी झालेल्या संप काळातील रजा अर्जित रजा म्हणून ग्राह्य धरणार, असा जीआर आज राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय, निमशासकीय शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दि. १४ मार्च २०२३ रोजीपासून संप पुकारण्यात आला होता. शासनाशी झालेल्या चर्चेनंतर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर २० मार्च २०२३ संप मागे घेण्यात आला होता.
संपाच्या पार्श्वभूमीवर शासनासोबत सोबत झालेल्या चर्चेत संप कालावधी अर्जित रजेतून देण्याचे तत्वतः मान्य करण्यात आले होते. अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्यात येऊन रजा विनावेतन होणार नाही असेही मान्य केले होते. तथापि, संपकालीन रजा ही असाधारण रजा म्हणून मंजूर केलाचा शासन निर्णय दि. २८/३/२०२३ रोजी जारी झाला. कर्मचारी, अधिकारी यांना असाधारण रजा केल्यामुळे त्यांचे वेतन कापले जाणार होते. शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांच्यावर हा अन्याय होता. त्याविरोधात मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर, शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. आज अखेर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज रजेबद्दल स्वयंस्पष्ट जीआर काढत शिक्षक, कर्मचारी यांना मोठा दिलासा आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.

