1 min read

राज्य सरकारने पत्रकारांच्या बंद केलेल्या सुविधा तातडीने सुरू कराव्या- डॉ. किशोर पाटील

Loading

राज्य सरकारने पत्रकारांच्या बंद केलेल्या सुविधा तातडीने सुरू कराव्या- डॉ. किशोर पाटील

ठाणे (मनिलाल शिंपी) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष श्री वसंत मुंडे राज्य संघटक श्री संजय भोकरे राज्य सरचिटणीस हरिभक्त पारायण डॉक्टर श्री विश्वासराव आरोटे कोकण विभागीय अध्यक्ष श्री नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव किशोर बळीराम पाटील यांनी बंद केलेल्या पत्रकारांच्या सुविधा राज्य सरकारने तातडीने सुरू कराव्यात अशा प्रकारची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील आम्ही सर्व पत्रकार लिखाणातून कोणाचे जीवन उध्वस्त होणार नाही यासाठी आमच्या लेखणीवर नियंत्रण ठेवतो , मात्र राज्य सरकारने अधिस्वीकृती धारक व ज्येष्ठ पत्रकार यांना बस सेवा, शिवशाही बस,मोफत केली आहे, तर रेल्वे प्रवासामध्ये ५० % सूट दिलेली आहे, तसेच आरोग्यदायी योजना याबाबत देखील पत्रकारांना सुविधा उपलब्ध केलेली आहे या सर्व सुविधा कोरोना कालामध्ये बंद केल्या आहेत, त्या अजून पर्यंत सुरू केल्या नाहीत म्हणून त्या तातडीने सुरू करून राज्य सरकारने पत्रकारांना सहकार्य करावे, त्याचप्रमाणे टोल नाक्यावर देखील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना टोलमाफ करावा असे आदेश विधानभवनातून जाहीर करण्यात आले होते, मात्र शिवशाही बसच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली व तो आदेश पारित करण्यात आला , मात्र टोलमाफीच्या त्या आदेशाची अंमलबजावणी अजून पर्यंत झालेली नाही, ती तातडीने मंजूर करावी असे दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ.किशोर बळीराम पाटील यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून मुख्यमंत्री सचिवालयाकडे मागणी केलेली आहे,
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ चांदा ते बांदा या उक्तीप्रमाणे संघटनेचे काम करत असताना संपूर्ण राज्यभरामध्ये गोवा, दिल्ली, बेळगाव, गुजरात, व महाराष्ट्र या पाच राज्यामध्ये या संघटनेचे कामकाज करत असताना पत्रकारांना दिलेल्या सुविधा बंद केल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात, पत्रकारांच्या सुखदुःखासाठी या संघटनेने आतापर्यंत आपले काम केले असून राज्य सरकारने कोरोना काळात पत्रकारांना विमा कवच दिले जाईल असे देखील जाहीर केले होते , ते देखील आमच्या पत्रकारांना मिळाले नाही, आमचे पत्रकार बांधव कोरोना काळामध्ये शहीद झाले त्यांना देखील राज्य सरकारने मदत केली नाही, पत्रकारांनी देखील लिखाणाच्या माध्यमातून राज्य सरकारला मोठे सहकार्य केले आहे ,मात्र राज्य सरकार पत्रकारांकडे नेहमी दुर्लक्ष करते, चौथा स्तंभ आहे मात्र हा चौथा स्तंभ डळमळीत करण्याचे काम राज्यकर्त्यांकडून नक्कीच होत आहे याकडे लक्ष देणे काळाची गरज आहे, त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारने आता पत्रकारांसाठी प्रत्येक अर्थसंकल्पात वेगळे बजेट केले पाहिजे ग्रामीण भागातील पत्रकार हा पत्रकारिता करत असताना त्याला असंख्य समस्येला सामोरे जावे लागते, पत्रकार संरक्षण कायदा झाला मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही होत नाही ग्रामीण भागातील जनतेच्या व्यथा शासन दरबारी मांडण्याचे मोठे काम आमच्या पत्रकार बांधवांनी केले आहे, व करीत आहेत ,आजही बाळशास्त्री जांभेकर यांचा जिल्हा हा सिंधुदुर्ग असून याच भागातील पत्रकारांवर जीवे मारण्याचा प्रकार झाला अनेकांचा जीव गेला, मात्र राज्य सरकारने अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी राज्यातील सर्व पत्रकार संघांनी केली.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात नव्हे तर गोवा दिल्ली बेळगाव गुजरात या राज्यात देखील आंदोलन करत या आंदोलनाची दखल अखेर या सरकारला घ्यावी लागली,त्यामुळे राज्य सरकारने पत्रकारांच्या बंद केलेल्या सुविधा तातडीने सुरू कराव्या अशा प्रकारची विनंती राज्य सरकारला दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ. किशोर बळीराम पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *