शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या कामाचा धडाका , विविध शैक्षणिक कामांसाठी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची भेट घेऊन चर्चा.
![]()


शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या कामाचा धडाका , विविध शैक्षणिक कामांसाठी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची भेट घेऊन चर्चा.
मुंबई ठाणे ( मनिलाल शिंपी )::दिनांक 12.04.2023 रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी शिक्षण उपसंचालक मुंबई यांची मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील गेले अनेक दिवस शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत होते, त्यात शिक्षकांची वयक्तीत मान्यता, शालार्थ आयडी, संच मान्यता दुरुस्ती, जावक नंबर जुळत नाहीत- सापडत नाहीत, आधार इनव्हॅलिड, शिक्षकांच्या अनुकंपा तत्वावर भरती, वरिष्ठ वेतन श्रेणी, तासिकांचे विषय, ज्युनि. कॉलेज संचमान्यता , अशे अनेक विषय घेऊन जवळपास 200 ते 250 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.*
*कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित शिक्षक शिक्षकांच्या कामाकडे स्वतः लक्ष घालून सर्वांची यादी तयार करायला लावली, यादी तयार झाल्या नंतर एक एक करून सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना आणि भगिनींना उपसंचालक संघवे साहेब आणि त्यांचे आधिकारी यांच्या समोर उभे करून काय समस्या आहे त्या समजून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर सोडविण्याच्या सूचना केल्या. एवढ्या मोठ्या गर्दीतून आमदार सरांनी एक एक करून सर्वांना न्याय दिला आणि सर्वांच्या समस्या समजून घेतल्या.
त्याचवेळी बाल भवन मध्ये माननीय शिक्षण मंत्री नामदार श्री केसरकर साहेब एका सभेसाठी आलेले होते, विनाअनुदानित शाळेतील व जूनियर कॉलेजमधील अनेक शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता रखडल्या आहेत, मान्यता देताना 10 जून 2022 च्या शासन निर्णयानुसार शिक्षकांची नेमणूक करताना उपसंचालक न्यायालयातून एनओसी घेणेबाबत अट आहे,
अनेक शाळांनी ज्युनिअर कॉलेजने त्यावेळेला एनओसी घेतलेली नव्हती म्हणून, अनेक वर्षापासून वैयक्तिक मान्यता मिळाली नाही, सदर एनओसी ची अट शिथिल करावी म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी त्याच ठिकाणी शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये आणि माननीय ना. दीपकजी केसरकर साहेब, यांना अट शिथिल करण्याबाबत विनंती केली,
माननीय शिक्षण मंत्र्यांनी सकारात्मक दाखवलेले असून सर्व गोष्टी तपासून, त्याविषयी निर्णय घेतला जाईल असे सांगितले, एनओसीची अट शिथिल करण्यासाठी आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर स्वतः पाठपुरावा करणार आहेत.सौ. वनिता लोबो मॅडम वसई यांचा गेले अनेक दिवस नियमित वेतन श्रेणी प्रस्ताव प्रलंबीत होता, आज तात्काळ त्या प्रस्तावाला मंजुरी देण्याकरिता म्हात्रे सरांनी सूचना केल्या आणि नियमानुसार आज तात्काळ नियमित वेतन श्रेणी लागू करण्याचे आदेश् माननीय श्री संगवे साहेब यांनी दिले आणि प्रश्न निकाली काढला.
लवकरच सिंधुदुर्ग ,रत्नागिरी , तसेच उपसंचालक कार्यालय कोल्हापूर शिक्षण विभागाला शैक्षणिक प्रलंबित कामांसाठी भेटी देणार असल्याची माहिती संपर्कप्रमुख
विष्णू विशे यांनी आमचे प्रतिनिधी मनिलाल शिंपी यांच्याशी बोलताना दिली.

