1 min read

महामानव, भारतरत्न ‘प्रबुद्ध भारत’चे संपादक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

Loading

महामानव, भारतरत्न ‘प्रबुद्ध भारत’चे संपादक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या 89व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या धुळे येथील निवासस्थानाच्या कम्पौंडमध्ये जागतिक किर्तीचे शिल्पकार धुळ्याजवळील गोंदूर गावाचे मुळ रहिवासी पद्मश्री, पद्मभुषण राम सुतार यांचे पुतणे रविंद्र भटू सुतार व स्नुषा सौ. मनिषा रविंद्र सुतार हे दाम्पत्य आपल्या करकमलांनी अतिशय हुबेहुब साक्षात जिवंत भासावेत अशा देखण्या पुतळ्यांची निर्मिती करीत असतात. त्यात अगदी राष्ट्रीय महापुरुष, समाजसुधारक ते शहरी ग्रामीण भागातील लहान मोठ्या दिवंगत नेते-कार्यकर्त्यांच्या पुतळ्यांचा सहभाग असतो. विविध नेते, समाजसुधारक यांच्या अनुयायांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी या सुतार दाम्पत्याच्या कलादालनात सर्वच महापुरुष शेजारी-शेजारी एकत्र नांदत असतात, जणू येथून ते शांती-समता-सद्‌भावनेचा-भाईचाराचा संदेश देत असतात. हे पुतळे इतके हुबेहुब तयार केलेले असतात की जवळ गेल्यावरच खात्री पटते की हे पुतळे आहेत. पहाटे मॉर्निंग वॉकला जात असतांना या महापुरुषांच्या पुतळ्यात जिवंतपणा वाटण्याचा अनुभव मी रोजच घेत असतो. आज तिकडून जात असताना महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर सुतार दाम्पत्याचा रंगरंगोटीचा शेवटचा हात मारण्याचे काम सुरु असताना, बाबासाहेबांचा हात पुढे केलेल्या बोटाकडे पाहुन माझे लक्ष गेले, जणू बाबासाहेब मला बोलावत असल्याचा भास झाला आणि सहज त्यांच्या पुतळ्याच्या दिशेने चालत जात जयंतीच्या पूर्वसंध्येला दर्शन घेत बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या चरणी नतमस्तक होत अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने ‘प्रबुद्ध भारत’, ‘बहि:ष्कृत भारत’, ‘मुकनायक’, ‘समता’ या वृत्तपत्रांचे चे संपादक बाबासाहेबांच्या सोबतच सर्व समाजसुधारकांच्या पुतळ्याला सुतार दाम्त्याच्या सोबत विनम्र अभिवादन केले आणि अभिवादनाची इतकी चांगली संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिल्पकार रविंद्र सुतार व सौ. मनिषा सुतार दाम्पत्याचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *