15 एप्रिल व 16 एप्रिल 2023 ला पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात व-हाळी हास्य कवी संमेलन व मराठी गझल मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन…
![]()
अमळनेरला साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयाच्या वतीने व-हाडी हास्य कवि सम्मेलन व मराठी गझल मुशायरा कार्यक्रम होणार…
दोन दिवसीय व्याख्यानमालेत शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात
उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा पुरस्काराने होणार सन्मान…



साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व चिटणीस प्रकाश वाघ यांची पत्रकार परिषदेत माहिती…
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील 147 वर्षाची वैभवशाली परंपरा असलेल्या पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात साने गुरुजी स्मृती पुरस्कार वितरण समारंभ व स्मृती व्याख्यानमाला बाबत नुकतीच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.
व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व चिटणीस प्रकाश वाघ होते.
कार्यक्रमाची प्रस्ताविक वाचनालयाचे संचालक ईश्वर महाजन यांनी केले .
वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे म्हणाले की 15 एप्रिल 2023 संध्याकाळी 6-30 वाजता पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय टिळक स्मारक समिती जुना टाऊन हाँल अमळनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
15 एप्रिल 2023 रोजी व-हाडी हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
- सादरकर्ते*
नितीन वरणकर शेगाव, प्राध्यापक संजय कावरे अकोला, गजानन मते परतवाडा, गौतम गुळधे परतवाडा हे वराडी हास्य कवि सम्मेलन सादर करणार आहेत.
या दिवशी यांना मिळणार पुरस्कार
शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे असे पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र अमळनेरचे संचालक विजय आधारसिंह पवार यांना खान्देशस्तरीय पूज्य साने गुरुजी स्मृती पुरस्कार ह भ प पू सद्गुरु प्रसाद महाराज गादीपती यांच्या शुभहस्ते पाच हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे..
विजयसिंह पवार हे स्पर्धा परीक्षेचे गेल्या दहा वर्षापासून केंद्र चालवत असून अनेक तळागाळातील मुलं वेगवेगळ्या पदांवर कार्यरत झाले आहेत .सरांनी आपली नोकरी इमाने इतबारे करत बाकीचा पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेतील मुलांना मार्गदर्शनासाठी ते खर्च करतात याबाबत अगोदरही त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रविवारी 16 एप्रिल 2023 ला मराठी गझल मुशायरा कार्यक्रम होणार
सादरकर्ते
गझलकार संदीप पटेल मुंबई, जयश्री कुलकर्णी नाशिक, विनय पाटील चोपडा, शरद धनगर अमळनेर ,योगिता पाटील चोपडा हे सादर करणार आहेत.
या दिवशी यांना पुरस्काराने करणार सन्मानित
अमळनेर पर्यावरण क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणारे अंबऋषी टेकडी ग्रुप अमळनेर यांना खान्देशस्तरीय पूज्य साने गुरुजी स्मृती पुरस्कार कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी राकेशजी जाधव यांच्या हस्ते पाच हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ प्रदान करण्यात येणार आहे.


अंबा ऋषी टेकडी ग्रुपने अनेक वृक्षांची लागवड करून अमळनेर शहराच्या विकासामध्ये भर टाकली आहे. आज पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे हा सन्मान पूर्ण टेकडी ग्रुपला दिला जाणार आहे.
तरी अमळनेर शहर व तालुक्यातील सर्व श्रोते वाचक बंधू भगिनी यांनी 15 एप्रिल व 16 एप्रिल 2023 चा अत्यंत छान असे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत तरी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आव्हान पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे सचिव प्रकाश वाघ उपाध्यक्ष सौ प्रा डॉ माधुरी भांडारकर, सहसचिव सुमित कुलकर्णी ,विश्वस्त चंद्रकांत नगावकर, कार्यकारणी सदस्य एडवोकेट रामकृष्ण उपासनी ,पी एन भादलीकर, भीमराव जाधव, निलेश पाटील, ईश्वर महाजन, दीपक वाल्हे प्रसाद जोशी यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पत्रकारांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे सचिव प्रकाश वाघ यांनी केला.

