उज्जैनकर फाउंडेशनचे मंगळवेढा येथील दुसरे राज्यस्तरीय बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन होणार पुढील वर्षी
![]()

उज्जैनकर फाउंडेशनचे मंगळवेढा येथील दुसरे राज्यस्तरीय बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन होणार पुढील वर्षी
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावचे दुसरे राज्यस्तरीय बाल,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन 3 मे 2023 रोज बुधवारला मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते परंतु काही तांत्रिक कारणांनी हे संमेलन तूर्त रद्द करण्यात येऊन ते पुढील वर्षी आयोजित करण्यात येईल अशी माहिती या संमेलनाचे आयोजक प्राचार्य डॉ. सुभाष कदम व फाऊंडेशनचे राज्य संपर्कप्रमुख डॉ.श्रीकांत पाटील तसेच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे पुढील तारीख आपणास तशी कळविले जाईल याची फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व साहित्यिक बंधू-भगिनी नोंद घ्यावी असेही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा या संमेलनाचे संयोजक डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे. नुकत्याच फाउंडेशनच्या झालेल्या झूम मीटिंगमध्ये याविषयी घोषणा करण्यात आली याप्रसंगी जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा चे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे विविध जिल्ह्यांचे समन्वयक व संपर्कप्रमुख तसेच राज्य कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. मागील वर्षी मुक्ताईनगर, फोंडा, गोवा तसेच पन्हाळागड जिल्हा कोल्हापूर या ठिकाण संमेलन आयोजित करण्यात आलेली होती एकाच वर्षी हे तीन संमेलन घेण्यात आलेली होती.

