नाशिक विभागाचे माजी शिक्षक आमदार श्री नानासाहेब बोरस्ते यांची डॉ. उज्जैनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
![]()

नाशिक विभागाचे माजी शिक्षक आमदार श्री नानासाहेब बोरस्ते यांची डॉ. उज्जैनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन आणि गायत्री हॉस्पिटल व गायत्री मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुक्यातील दहा एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा भव्य सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले नाशिक विभागाचे माजी शिक्षक आमदार श्री नानासाहेब बोरस्ते , नाशिक जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष प्रा.रवींद्र मोरे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.ईश्वर जाधव यांनी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांच्या निवासस्थानी भेट दिली असता याप्रसंगी उज्जैनकर सर यांनी मान्यवरांचा गुलाब बुके त्याचप्रमाणे स्वलिखित प्रबोधनाची ज्ञान दिंडी हे पुस्तक भेट देऊन सत्कार केला याप्रसंगी श्री नानासाहेब बोरस्ते यांनी सुद्धा त्यांचे स्वलिखित अंतरीच्या नाना कळा, वळण वाट, तिपाई हे तीन काव्य संग्रहाचे पुस्तक उज्जैनकर सर यांना सप्रेम भेट दिलीत या प्रसंगी उज्जैनकर सरांचे वडील श्री मधुकरराव उज्जैनकर फाउंडेशनचे जळगाव जिल्हा सचिव श्री गणेश कोळी सर उपस्थित होते. याप्रसंगी श्री नानासाहेब बोरस्ते यांनी उज्जैनकर सरांच्या कार्याचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन केले. सन 2019 मध्ये फाऊंडेशन तर्फे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्री नानासाहेब बोरस्ते यांच्या गाव शिव या काव्यसंग्रहास तापी पूर्णा राज्यस्तरिय उत्कृष्ट काव्य पुरस्कार प्राप्त झाला होता याची सुद्धा त्यांनी याप्रसंगी आठवण काढली.

