पालघर जिल्ह्यात नव्याने सुरू होणाऱ्या पे युनिट कार्यालया साठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आमदार पदाच्या पहिल्या पगारातून संगणक प्रिंटर देण्याचे आश्वासन
![]()

पालघर जिल्ह्यात नव्याने सुरू होणाऱ्या पे युनिट कार्यालया साठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आमदार पदाच्या पहिल्या पगारातून संगणक प्रिंटर देण्याचे आश्वासन
मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी):ठाणे व पालघर जिल्हा एकत्रित होता, त्यावेळी दोन्ही जिल्ह्यासाठी एकच पे युनिट कार्यालय आज पर्यंत सुरू होते, सन 2015 रोजी ठाणे आणि पालघर जिल्हा वेगवेगळे झाल्याने सर्व शासकीय कार्यालय पालघर मध्ये स्वतंत्ररीत्या सुरू झाली होती, तसेच शिक्षण विभागाचे जिल्हा परिषद कार्यालय सुद्धा पालघर मध्ये सुरू झालेले होते मात्र पे युनिट कार्यालय आजपर्यंत ठाणे जिल्ह्यातच सुरू होते
सुमारे 100 ते 150 किलोमीट अंतरावरून ठाणे जिल्ह्यात दरमहा नियमित वेतन व अन्य प्रकारची बिले सादर करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर बांधवांना यावे लागत होते. शारीरिक आजार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना , तसेच महिला शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींना प्रवासामध्ये त्रास होत होता , दिवसाभराच्या प्रवासामुळे शालेय कामकाज सुद्धा प्रलंबित राहत होते, अनेक शाळांमध्ये लिपिक सुद्धा उपलब्ध नसल्याने मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सुद्धा ठाणे पे युनिट कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत होते, या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन , आमदार झाल्याबरोबर ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी पालघर जिल्ह्यात तातडीने पे युनिट कार्यालय सुरू करावे म्हणून पाठपुरावा केला, त्यानुसार पालघर शासकीय इमारतीमध्ये स्वतंत्र जागा सुद्धा उपलब्ध झाली असून, काल आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर पालघर जिल्ह्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक समस्या जाणून घेण्यासाठी गेले असता नव्याने सुरू होण्यास पालघर ‘ पे युनिट’ कार्यालयाला भेट देऊन रिबीन कापून कार्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी खुले केले, हा कार्यक्रम पूर्वनियोजित नव्हता, परंतु पालघर मधील शिक्षक शिक्षकेतर व शाळांची गैरसोय होऊ नये म्हणून , अनौपचारिक उद्घाटन केले आहे. त्या ठिकाणी लागणाऱ्या साहित्यामध्ये स्वतःच्या “आमदार पदाच्या पहिल्या पगारातून” संगणक व प्रिंटर लगेच तातडीने उपलब्ध करून देतो असे सांगितले.( आमदार निधीतून हे साहित्य देण्यासाठी वेळ लागला असता ) “माझा कोणताही शिक्षक शिक्षकेतर बांधव” या कार्यालयातील नव्याने सुरू होणाऱ्या यंत्रणेअभावी पगारापासून वंचित राहणार नाही याचीही काळजी घेण्याची आश्वासित केले, तसेच एप्रिल 2023 पेड इन मे महिन्याचा पगार याच कार्यालयातून मिळेल असेही आश्वासित केले. याप्रसंगी पे युनिट कार्यालयाचे अधीक्षक श्री नरेश पाटील साहेब व लिपिक श्री उबाळे यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचे स्वागत केल सोबत संपर्कप्रमुख अरुण भोईर सर, रवी नाईक सर, राजेंद्र सांबरे सर , कैलास देवरे ,धर्मेंद्र शुक्ला ,समीर पिंपळे, प्रीतम घरत, जगन्नाथ खारीक सर, उपस्थित होते

