शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या प्रयत्नाला यश मार्च 2023 पेड इन एप्रिल नियमित वेतनाची ग्रँड उपलब्ध
![]()

*शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या प्रयत्नाला यश मार्च 2023 पेड इन एप्रिल नियमित वेतनाची ग्रँड उपलब्ध
मुंबई ठाणे( मनिलाल शिंपी):महाराष्ट्र राज्यातील शाळांचे मार्च2023 पेड इन एप्रिलचेे पगार अनेक दिवसापासून रखडले करता, फेब्रुवारी महिन्याच्या पगारातून अनेक कर्मचाऱ्यांचे इन्कम टॅक्स कपात झाले होते, त्यामुळे दोन महिन्यापासून सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते, याकरता कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी शिक्षण मंत्री ना. श्री दीपकजी केसरकर साहेब , व वित्त विभागाचे अप्पर सचिव यांना निवेदन दिले ,तसेच फोनवर संपर्क साधून राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, अक्षय तृतीया हे सण आलेले आहेत. नियमित पगार होणे गरजेचे आहे याकरता सतत पाठपुरावा केला. चालू महिन्याचा पगार न आल्याने अनेक शिक्षक शिक्षकेतर बांधव हवालदील झाले होते, या करता ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी विशेष प्रयत्न केले म्हणून, काल रात्री उशिरापर्यंत ग्रँड जमा झाल्याचे शिक्षण सहाय्यक संचालक श्री हरून अत्तार साहेब यांनी माहिती दिली तसेच, सर्व पे युनिट कार्यालयांना सदर पगाराचा निधी सुद्धा वर्ग केला आहे, पुढील 2 दिवसांमध्ये सर्वांचे पगार होतील* शिक्षक- शिक्षकेतर बांधवांच्या "प्रत्येक समस्यासाठी धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर," शिक्षकांसाठी तळमळ करणारा आमदार म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची ओळख संपूर्ण राज्यभर आहे, सरांच्या या सर्व मेहनतीला सर्व शिक्षक- शिक्षकेतर वर्गातर्फे सदैव प्रणाम करण्यात येत आहे अशी माहिती संपर्क प्रमुख
विष्णू विशे यांच्याकडून देण्यात आली .

