प्रा डॉ गुणवंत सोनवणे यांचा
स.ध.भावसार यांनी केला सत्कार !
![]()

प्रा डॉ गुणवंत सोनवणे यांचा
स.ध.भावसार यांनी केला सत्कार !
पारोळा – येथील किसान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ गुणवंत हरी सोनवणे यांची कबचौ उमविच्या रसायनशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि पारोळा तालुक्याला अभ्यास मंडळ अध्यक्षाचा प्रथमच बहुमान मिळाल्याचा आनंद वाटल्याने एक तालुकावासी नागरिक व गुणग्राहक व्यक्तिमत्व राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी प्रा डॉ सोनवणे यांना आपल्या निवासस्थानी बोलावून शाल, श्रीफळ, पुष्पहार व अभिनंदन पत्र देऊन भावपूर्ण सत्कार केला आणि या नूतन कार्यात पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व अनेकोत्तम शुभ आशीर्वाद दिले.
भावसार सरांनी आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ९३५ विद्यार्थी, प्राध्यापक, पुरस्कार प्राप्त व्यक्ती,गुणीजन इ.चे भावपूर्ण सत्कार करुन प्रेरणा व प्रोत्साहन दिले आहे.
सदर उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाय्.व्ही.पाटील, रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक व डॉ.सोनवणे सरांचे कुटुंबीय यांनी आनंद व्यक्त करुन भावसार सरांचे आभार मानले !

