1 min read

हिन्दू स्मशानभुमीत दहन संस्कारासाठी गोवऱ्या मिळाव्यात,क्षेत्रीय काच माळी समाजाचे मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद यांना निवेदन

Loading

हिन्दू स्मशानभुमीत दहन संस्कारासाठी गोवऱ्या मिळाव्यात

क्षेत्रीय काच माळी समाजाचे मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद यांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
संदर्भिय विषयान्वे आम्ही निवेदन देतो की, अमळनेर नगर परिषदेच्या मार्फत हिन्दू स्मशानभुमीत दहन संस्कारासाठी प्रति संस्कारास ७ मण लाकूड उपलब्ध केले जाते. चोपडा
रोड हिन्दू स्मशानभुमी व खळेश्वर हिन्दू स्मशानभुमी एकत्रीत पणे सरासरी दर दिवशी ४ दहन संस्कार गृहीत धरल्यास २८ मण लाकूड लागते. तर महिन्याला ८४० मण या हिशोबाने
वर्षाला १०,०८० मण लाकूड लागते. गेल्या १५ ते २० वर्षापासून नगर परिषद अमळनेर दहन संस्कारासाठी लाकूड उपलब्ध करुन देत असून हजारो टन लाकूड या कामी लागले
आहे. त्यासाठी हजारो वृक्ष तोडले व कापले गेले आहेत त्यातून पर्यावरणाचा मोठया प्रमाणात
हास झाला आहे.
गेल्या तीन वर्षा पासून संपूर्ण महाराष्ट्रात माझी वसुंधरा हे अभियान नगर परिषदेच्या माध्यमातून राबविले जात आहे. त्या अंतर्गत वृक्ष लागवडीवर भर देण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियानात अमळनेर नगरपरिषद ही सहभागी असल्याने एका बाजूने वृक्षारोपण आणि
दुसऱ्या बाजूने दहनासाठी लाकूड उपलब्ध करण्यासाठी लाकडाचा ठेका देवून वृक्षतोडीस प्रोहत्साहन ही विसंगती आहे.म्हणून माझी वसुंधरा अभियान राबविल्या जाणाऱ्या वर्षाचे औचित्य साधून चोपडा रोड हिन्दू स्मशानभुमी व खळेश्वर हिन्दू स्मशानभुमी येथे दहन संस्कारासाठी अमळनेर नगर परिषदेकडून गोवऱ्या उपलब्ध करण्यासाठी लाकडा ऐवजी गोक्याचा ठेका देण्यात यावा त्या
निमित्ताने वृक्षतोडीस आळा बसून गोवंश संवर्धन व पालनास हातभार लागेल. त्या प्रमाणे खळेश्वर हिन्दू स्मशानभुमी येथे नगरपरिषदे मार्फत स्वरक्षण भिंतीचे काम
उत्कृष्ट पणे पुर्ण झाले असून बाकी असलेले लोखंडी दरवाजे व नदीपात्रात उतरण्यासाठी केलेल्या पायऱ्याचे लोखंडी रिलिंग लवकरात लवकर बसवून मिळावे ही नम्र विनंती.
सदर निवेदनाची दखल घेवून समस्त वृक्षप्रेमी हिन्दू बांधवांचा भावनेचा आदर ठेवुन
दहन संस्कारासाठी लाकड़ ऐवजी गोवऱ्या उपलब्ध करुन द्याव्यात क्षेत्रीय काच माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन, उपाध्यक्ष मनोहर माळी सचिव गणेश महाजन ,सहसचिव कैलास महाजन, कार्यकारी सदस्य गंगाराम महाजन, गुलाम माळी, बाबूलाल महाजन, ऍडव्होकेट सुदाम महाजन ,पांडुरंग माळी, ज्ञानेश्वर महाजन ,अशोक महाजन ,रमेश महाजन, प्राध्यापक सुभाष महाजन रवींद्र महाजन ,राजेंद्र महाजन, गणेश महाजन, देविदास महाजन यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *