एमबीबीएसच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी समाजाची प्रामाणिकपणाने सेवा करावी — नानासाहेब बोरस्ते
![]()


एमबीबीएसच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी समाजाची प्रामाणिकपणाने सेवा करावी — नानासाहेब बोरस्ते
उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर व गायत्री हॉस्पिटल आणि मेडिकल मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच तालुक्यातील दहा एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा नाशिक विभागाचे माजी शिक्षक आमदार श्री नानासाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली जैस्वाल लॉन येथे भव्य अशा सत्कार समारंभ प्रसंगी श्री नानासाहेब बोरस्ते म्हणाले की एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या सर्व मेहनती विद्यार्थ्यांनी समाजाची प्रामाणिक सेवा करून आरोग्य सेवा प्रदान करावी यासाठी समाजाचे सुद्धा योगदान मिळवावे असे श्री बोरस्ते प्रसंगी म्हणाले यावेळी मुक्ताईनगरचे आमदार श्री चंद्रकांतभाऊ पाटील यांनी सुद्धा उपस्थित एमबीबीएस गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आई-वडिलांचे आणि तालुक्याचं नाव रोशन केल्याबद्दल त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले प्रसंगी सुप्रसिद्ध वृद्ध रोग तज्ञ डॉ. एन. जी. मराठे यांनी परिश्रम आणि मेहनत, खडतड प्रवास या जिद्दीवर एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण आपण झालात त्याची जाण ठेवून आई-वडिलांचे सेवा समाजाची सेवा करून आपण प्रमाणिकपणाने समाजाची आरोग्यदायी सेवा करावी असावी मुलाचा सल्ला त्यांनी दिला. या कार्यक्रमाचे सरस्वती सावित्री श्री गणेश आणि आदिशक्ती मुक्ताई व धन्वंतरी मातेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले प्रसंगी उत्तीर्ण एमबीबीएस विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी केले याप्रसंगी त्यांनी फाउंडेशनचे विविध उपक्रमाविषयी व एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभा विषयी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक वाडेकर श्री आर. के. ढोले व श्री गणेश कोळी यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे आयोजक डॉ.सुनील उदय यांनी मानले

