1 min read

विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ‌

Loading

विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ‌

विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था दिल्लीची संलग्नित विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्या वतीने अंगणवाडी (शिशु वर्ग ) , पूर्व प्राथमिक , प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक व पालकांसाठी पायाभूत स्तर एन.ई.पी. ( N..E.P. ) प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ‌३ में ते १३ में २०२३ या कालावधीत अमळनेर जि. जळगाव येथे करण्यात आले आहे.
आपल्यावर आलेली पालकत्वाची जबाबदारी हे निश्चितच कस लावणारी असते. प्रत्येक पालक आपल्या पाल्याला उत्तम दर्जेदार व संस्कारित शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी विद्याभारती शिक्षक पालक हितचिंतक यासाठी दरवर्षी एका प्रशिक्षण व प्रबोधन वर्गाचे आयोजन करत असते नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे एन. इ. पी. २०२० सर्वत्र लागू करण्यात आले आहे या धोरणात शालेय शिक्षणाचे टप्पे ५+३+३+ ४ असे आहेत. या प्रशिक्षणात एन. ई. पी. ची ही माहिती देण्यात येणार आहे. याच वर्गात सोबत एन.ई. पी. वर्ग , बालिका शिक्षण , संस्कृति ज्ञान परीक्षा , वैदिक गणित , योग व संगित यांचेही प्रशिक्षण वर्ग वेगळे असणार आहे.
तरी या प्रशिक्षण वर्गात शिक्षक पालक व त्यांच्या हितचिंतक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन विद्याभारती देवगिरी प्रांत यांच्यावतीने वर्ग व्यवस्था प्रमुख तथा विद्या भारती देवगिरी प्रांताचे प्रचार व प्रसार प्रमुख श्री. राजेंद्र निकुंभ , ८६२५९३००२२ , ९४२३९०३२४५ , जिल्हा अध्यक्ष श्री. दिलीप भावसार ९५२७७१८३५५ , वर्ग व्यवस्था सहप्रमुख श्री. दिनेश नाईक ९२२६७८५७९५ , प्रांताध्यक्ष श्री विवेक काटदरे , प्रांत मंत्री श्री प्रकाश पोद्दार , प्रांत सहमंत्री श्री. दिनेश देशपांडे , प्रांत शिशु वाटिका संयोजिका सौ. वनमाला कुलकर्णी , प्रांत शिशु वाटिका सह संयोजिका सौ.सुरेखा सोनार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
हा प्रशिक्षण वर्ग खांदेश शिक्षण मंडळ अमळनेर संचलित प्रताप महाविद्यालय , अमळनेर जिल्हा जळगाव येथे होणार आहे. हा प्रशिक्षण वर्ग निवासी असून त्यामध्ये निवास व्यवस्था, भोजन , न्याहरी , प्रशिक्षण साहित्य व प्रशिक्षणाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे. या वर्गासाठी शुल्क रुपये दोन हजार ( २००० ) इतके ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *