शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन आणि गायत्री हॉस्पिटल व मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताईनगर तालुक्यातील दहा एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांचा झाला सन्मान
![]()





शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन आणि गायत्री हॉस्पिटल व मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताईनगर तालुक्यातील दहा एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांचा झाला सन्मान
मुक्तानगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन आणि गायत्री हॉस्पिटल व गायत्री मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच तालुक्यातील दहा एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ नाशिक विभागाचे शिक्षक आमदार श्री नानासाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य आणि दिव्य स्वरूपात येथील जैस्वाल लॉन येथे संपन्न झाला. प्रसंगी व्यासपीठावर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील सुप्रसिद्ध हृदय तज्ञ डॉ. एन. जी.मराठे श्री यु. डी. पाटील नाशिक जिल्हा टीडीएफ चे अध्यक्ष प्रा.रवींद्र मोरे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.ईश्वर जाधव तसेच डॉ. सुनील उदे यांचे माता, पिता श्री सोमाप्पा उदे व सौ. गयाबाई उदे प्रसंगी आदिशक्ती संत मुक्ताई धन्वंतरी माता, श्री गणेश, सरस्वती आणि सावित्री यांच्या प्रतिमेचं मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून पूजन केल. याप्रसंगी मान्यवरांचा शाल,श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला प्रसंगी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार श्री नानासाहेब बोरस्ते आमदार चंद्रकांतभाऊ पाटील डॉ. एन. जी. मराठे डॉ. सुनील उदे व त्यांचे माता पिता व मान्यवरांच्या शुभहस्ते तालुक्यातील नुकतेच एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व गुलाब बुके देऊन सत्कार केला याप्रसंगी डॉ. सागर सुनील उदे मुक्ताईनगर डॉ. कुंदन भास्कर धायडे घोडसगाव डॉ.मानसी मनोज महाजन मुक्ताईनगर डॉ. साक्षी घनश्याम तावरे मुक्ताईनगर डॉ. शंतनु महेंद्र गावंडे मुक्ताईनगर डॉ. निलग्रिव लीलाधर गायकवाड मुक्ताईनगर डॉ.जय नितीन जैन मुक्ताईनगर डॉ. कृष्णा प्रल्हाद निळे चांगदेव डॉ. जगदीश मोतीलाल सोनवणे पूर्णाड या गुणवंताचे आई-वडील सुद्धा उपस्थित होते यांनी सुद्धा उपस्थित एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाल व बुके देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री आर. के. ढोले व प्रा.विनायक वाडेकर आणि श्री गणेश कोळी यांनी केले तर शेवटी आभार गायत्री मेडिकलचे व या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. सुनील उदे यांनी केले.

