1 min read

दिगंबर कुंभार याचा
आदर्श शिक्षकाने केला सत्कार !

Loading

दिगंबर दिपक कुंभार याचा
आदर्श शिक्षकाने केला सत्कार !
पारोळा – येथील किसान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक दिगंबर दिपक कुंभार याची मुंबई येथे आयोजित राज्य युवा संसद २०२३ साठी खासदार म्हणून निवड झाल्याचा विशेष आनंद वाटल्याने येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी त्याचे निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पहार, गौरव पत्र, अभिनंदन पत्र व रोख बक्षीस देऊन भावपूर्ण सत्कार केला आणि राज्य युवा संसद व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व अनेकोत्तम आशीर्वाद दिले.
सदर उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाय्. व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ. गुणवंत सोनवणे,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डा.प्रदीप औजेकर व दिगंबरचे कुटुंबीय यांनी आनंद व्यक्त करुन भावसार सरांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *