नैतिक शिक्षण स्पर्धा परिक्षेत टिळकनगर शाळेतील विद्यार्थ्यांची चमक.
पुस्तक वाचनातून संस्कृतीची,आणि महान चरित्राची ओळख होते.: प्रा. डॉ.विनय भोळे.
![]()


नैतिक शिक्षण स्पर्धा परिक्षेत टिळकनगर शाळेतील विद्यार्थ्यांची चमक.
पुस्तक वाचनातून संस्कृतीची,आणि महान चरित्राची ओळख होते.: प्रा. डॉ.विनय भोळे.
ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी): संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मुंबई यांच्या विविध विभागांकडून भारतीय संस्कृतीचे जतन आणि संरक्षण व्हावे म्हणून विविध नैतिक शिक्षणाचे उपक्रम राबविले जातात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नैतिक शिक्षणाची स्पर्धा परीक्षा. इयत्ता पाचवीसाठी ‘चरित्र रामायण’, सहावीसाठी ‘कथारूप रामायण’ सातवीसाठी ‘कथारूप महाभारत’ आणि आठवीसाठी ‘क्रांती गाथा’ या पुस्तकांवर आधारित स्पर्धा परीक्षा आयोजित केली जाते.
26 जानेवारी 2023 रोजी झालेल्या ह्या स्पर्धा परीक्षेत टिळकनगर शाळेतील चैतन्य भोर, मृण्मयी जोगळेकर, क्षितिज फडणीस आणि शार्दुल औटी या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक आणि पाचशे रुपये रोख बक्षीस पटकवले. तर गौरांग डिंगोरकर, जागृती पाटील, स्वरदा माळेकर आणि सुमेध इंगावले या विद्यार्थ्यांना रजत पथक आणि पाचशे रुपयांचे रोख बक्षीस मिळाले.
शाळेतील इयत्ता पाचवी ते आठवीतील एकूण ७५० विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवला होता. नेमून दिलेल्या पुस्तकांप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या सदस्या सौ वृशाली जांदे या उपक्रमाच्या संयोजिका होत्या. सुनियोजित आणि सुंदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मॉडेल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. विनय भोळे आणि गुरुकुल दी. डे. स्कूलच्या संस्थापिका सौ गौरी करकरे यांच्या हस्ते बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. हिंदू संस्कृतीचे संवर्धन व्हावे म्हणून असे उपक्रम शाळांमधून राबवणे ही काळाची गरज वाटते. अशा प्रकारच्या पुस्तकांच्या वाचनातून आपल्या संस्कृतीची, महान चरित्रांची ओळख होते आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते.असे प्राचार्य डॉ विनोद भोळे यांनी यावेळी सांगितले.अशी सविस्तर माहिती आर एस पी अधिकारी शिक्षक निवृत्ती खराटे यांनी दिली.

