1 min read

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे आयुक्तांची भेट घेत राज्यातील प्रलंबीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या

Loading

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे आयुक्तांची भेट घेत राज्यातील प्रलंबीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या


*राज्यातील शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक कामे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती , ती पूर्ण व्हावीत म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर आणि आमदार जयंत आसगावकर साहेब यांनी शिक्षण आयुक्त मा. सुरज मांढरे साहेब यांच्याबरोबर चर्चा केली व तातडीने कामे सोडवण्यास सांगितले त्यामध्ये प्रामुख्याने संच मान्यता व दुरुस्ती, नव्याने येणारे 20% अनुदान, पूर्वीचे 20, 40 60 टाक्यावर देण्यात येणारे अनुदान, शालार्थ आयडी, जावक नंबर, आधार कार्ड इन्व्हॅलिड व मिस मॅच, मूल्यांकन आणि त्रुटी पूर्तता, स्टुडण्ट पोर्टल बंद असल्याने होणाऱ्या आधार व्हॅलिड इनव्हॅलिड,अश्या अनेक अनेक वर्षे प्रलंबीत असलेल्या समस्यांवर सकारात्मक चर्चा केली आणि यातील काही प्रश्न आयुक्त महोदयांनी तात्काळ सोडविण्याचे आदेश दिले* *आज राज्यातील शिक्षक शिक्षकेतर बांधवांनी आप आपल्या समस्या मांडल्या त्यानंतर आमदार म्हात्रे सरांनी मा. आयुक्त, त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांना वरील प्रलंबीत प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना केल्या, त्यांच्या समवेत मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष सुभाष माने सर, अरुण थोरात सर, सध्याचे अध्यक्ष जे के पाटील सर, सचिव शांताराम पोखरकर सर, तानाजी माने सर, प्रसाद गायकवाड सर, चौगुले सर, सुनिल जगताप सर, म्हसरे सर, प्रवीण लोंढे सर, प्रकाश मगर सर, व अन्य कार्यकर्ते तसेच समस्याग्रस्त 200 ते 250 शिक्षक उपस्थीत होते.*

आज तात्काळ सोडविण्यात आलेले विषय

1) ज्यांचे शिक्षणाधिकारी कार्यालयात जावक रजी नंबर सापडत नाहीत त्यांच्या सुनावण्या न घेता नोकरीला लागल्याचे हजेरी पत्र, मस्टर, बोर्डाचे पेपर तपासणी पुरावे व अन्य पुरावे पाहून अनूदान आदेश दिला जाईल
2) आधार व्हॅलिड इनव्हॅलिड ची साईट पुढील 2 दिवसात सुरु होईल, संच मान्यतेमधील शिक्षकांची न आलेली पदे अपडेट करून तात्काळ संच मान्यता मिळतील.
3) 40 व 60 टक्के टप्यावरील शाळांना शेवटच्या वर्गाची पटसंख्या शिथील करण्यात आली. तसेच नव्याने 20 टक्के अनूदानावर येणाऱ्या शाळांच्या पटसंख्या शिथिलीकरणासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर 5 एप्रिल ला शिक्षणमंत्रांची भेट घेणार आहेत.
4) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यरत पदे पाहून त्यांनाही पुढील टप्पावाढ दिला जाईल.
5) ज्या शाळांनी मूल्यांकनाचे प्रस्ताव त्रुटी पूर्तता करून शिक्षण संचालक कार्यालयास जमा केले होते त्यांची नावे अनुदानाच्या यादीत घेण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे.
6) संच मान्यता दुरुस्ती अनेक दिवसांपासून प्रलंबीत आहे त्याची दुरुस्ती करण्याची कार्यवाही एका आठवड्याच्या आत केली जाणार आहे.
7) राज्यातील बीएड च्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विधार्थ्यांचे चौथ्या सेमिस्टरचे गुणपत्रक मिळाले नव्हते अशा सुमारे 1500 विध्यार्थाच्या भवितव्यासाठी, उच्च शिक्षण संचालक यांची भेट घेऊन 15 दिवसाच्या आत योग्य ती कारवाई करून निकाल मिळणार आहेत. यासाठी प्रयत्न केले.
8) शालार्थ आयडी. देण्याचे आधिकार शिक्षणाधिकारी व उपशिक्षण संचालक यांना देण्यात आले असून 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच राज्यातील अनेक शिक्षक, शिक्षकेतर, बंधू, भगिनी आपल्या व्यक्तिगत समस्या घेऊन आल्या होत्या, त्यांच्या समस्या समजून घेऊन मा. आयुक्त महोदयांना निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *