1 min read

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे गावगाव फिरत्या वाचनालयाला प्रारंभ

Loading

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे गावगाव फिरत्या वाचनालयाला प्रारंभ

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे आज दिनांक १९ मार्च २०२३ रोज रविवारला कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे, गावगाव फिरते वाचनालय दुई, सुकळी, सोमनगाव,डोलारखेडा, नांदवेल, चिंचखेडा, टाकळी आदी गावांमध्ये नुकताच प्रारंभ करण्यात आला या फिरत्या वाचनालयामध्ये एमपीएससी व यूपीएससी तसेच बाल साहित्य, अध्यात्मिक, कथा, कविता, कादंबरी, संस्कारक्षम, वैचारिक ग्रंथांचाही समावेश आहे. गावामध्ये वाचक वर्ग वाढवण्यासाठी तसेच मराठी भाषा प्रचार व प्रसारासाठी ही फिरत्या वाचनालयाची ओमिनी गाडी दर आठवड्याला किंवा सुट्टीच्या दिवशी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये फिरणार असल्याचे प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा उपक्रमशील शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी दुई गावातील सरपंच श्री शुभम कोचुरे, माजी सरपंच श्री संदीप जावळे आदी व ग्रामस्थ उपस्थित होते सुकळी ग्रामपंचायत मध्ये माजी सभापती श्री विकासभाऊ पाटील श्री नथूभाऊ कोळी, श्री रवींद्र कोळी श्री नितीन पाटील, श्री कडू पाटील, श्री पुंडलिक कोळी, श्री प्रेमा चव्हाण, श्री अनिल जाधव, श्री संदीप चव्हाण आदी उपस्थित होते तर नांदेल येथील सरपंच श्री प्रवीण खेडकर, श्री मंगेश पाटील तसेच चिंचखेडा येथील सरपंच श्री पद्माकर तायडे, टाकळी येथील सरपंच सौ.शांताबाई चव्हाण व असंख्य वाचक वर्ग या प्रसंगी उपस्थित होते यावेळी विविध ग्रामपंचायतच्या सन्माननीय सरपंचांना गाव गाव फिरत्या वाचनालयाच्या उपक्रमाच्या माहितीचे पत्र देण्यात आले यावेळी सर्व सन्माननीय सरपंचांचा उज्जैनकर सर यांनी गुलाब बुके देऊन सत्कार्य केला प्रसंगी फाउंडेशनचे जळगाव जिल्हा सचिव श्री गणेश कोळी सर यांनी प्रत्येक ठिकाणी प्रास्ताविक करून या उपक्रमाची माहिती दिली प्रसंगी श्री बाबुराव मुंधोकार व अमीर चौधरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *