प्रहार न्यायमंच संघटनेचा जुनी पेंशनच्या बेमुदत संपात सक्रीय सहभाग.
![]()

प्रहार न्यायमंच संघटनेचा बेमुदत संपात सक्रीय सहभाग.
जळगांव प्रतिनिधी(हेंमत मोरे)
राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील दि.१ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना नियम १९८२ व नियम १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे, या मागणीसाठी दि.१४ मार्च २०२३ पासून बेमुदत संप सुरू आहे, या संपात इतर मागास बहुजन कल्याण विभाग आश्रमशाळा जळगाव जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी आहेत, जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मा.सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्याद्वारा शासनाला अखिल भारतीय प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी न्यायमंच (आश्रमशाळा विभाग शाखा जळगांव) यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदन देते प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील आश्रमशाळेतील जुनी पेन्शन योजना लागू असलेले कर्मचारी व नवीन पेन्शन योजना लागू असलेले कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. जुनी पेन्शन मिळण्याबाबतच्या घोषणांनी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाचा परिसर दणाणून निघाला होता.
प्रहार न्यायमंच संघटनेचे पदाधिकारी व सभासद जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात असून, बेमुदत संपात सक्रीय सहभागी आहेत, दररोज समन्वय समितीच्या वतीने एका ठिकाणी सर्व एकत्र येत, विविध कार्यक्रम घेत शासनाला जुनी पेन्शन योजना लागू करा, अशी मागणी या कार्यक्रमातून संघटनेचे पदाधिकारी करत आहे.
जिल्हा सहायक आयुक्त यांना निवेदन देते प्रसंगी राज्य सचिव हेमंत मोरे, जिल्हाध्यक्ष आबा पाटील, उपजिल्हाध्यक्ष सतीश वाघ, सचिव प्रकाश पाटील, सह सचिव प्रमोद निकुंभे, कार्याध्यक्ष सर्जेराव पाटील, सह कार्यध्यक्ष अनिल आहिरे, संपर्कप्रमुख संजय पाटील, प्रसिद्धी प्रमुख नितीन चव्हाण, संघटक अरून परदेशी, सदस्य धनंजय सैंदाणे व जिल्ह्यातील आश्रमशाळा कर्मचारी उपस्थित होते.

