जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर असल्याने कर्मचाऱ्यांनी कोणती काळजी करू नका ..
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) आवाहन
![]()

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर असल्याने कर्मचाऱ्यांनी कोणती काळजी करू नका ..
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) आवाहन
अमळनेर प्रतिनिधी
उद्या दिनांक १४ मार्च २०२३ पासून राज्य समन्वय समितीसह महाराष्ट्र माध्यमिक
शिक्षक संघ ( फेडरेशन) च्या वतीने घोषित “बेमुदत संप ” आंदोलन सुरु करण्यात येत
आहे.आपल्या संघटना क्षेत्रातील शिक्षक / शिक्षकेतर बंधु-भगिनी यांना त्यानुासर सुचना द्याव्यात.
बेमुदत संप असल्याने संपात सहभागी असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेचे कोणतेही काम करायचे नाही. ” बोर्डाची किंवा शाळेची परीक्षा असली तरी आपण संपावर असल्याने आपणास त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण
जुनी पेंशन योजना व इतर महत्वपूर्ण मुलभूत मागण्या आपल्या अस्तित्व व भवितव्यासाठी मंजुर करुन घेणे आवश्यक आहे. म्हणून सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींनी पुढील सूचना मिळेपर्यंत शाळेत
जाऊ नये तसेच संघटनेच्या संपर्कात रहावे. कोणत्याही प्रकारच्या अफवा अथवा दबाब याला बळी पडू नये व आंदोलन पूर्ण ताकदीनिशी १००% यशस्वी करावे असे आपल्या
संघटनेच्यावतीने आवाहन करण्यात यावे. कोणतीही शंका / प्रश्न उद्भवल्यास राज्य संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती.आज मंत्रालयात मागण्यांसंबंधी आयोजित सभेस महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ
(फेडरेशन) चे मुंबई विभागीय अध्यक्ष श्री. सतीश इनामदार फेडरेशनच्या वतीने उपस्थित होते. जोपर्यंत आपल्या आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत कोणत्याही अफवाला बळी पडू नका असे आवाहन महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे (फेडरेशन) अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे व सेक्रेटरी शालिग्राम भिरूड यांनी केले आहे.

