आर एम बी के एस ‘प्रोटान’ तर्फे अमळनेर येथे तहसिलदार यांना निवेदन..
![]()

आर एम बी के एस ‘प्रोटान’ तर्फे अमळनेर येथे तहसिलदार यांना निवेदन..
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यात एकाच वेळी एकाच दिवशी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. याचा एक भाग म्हणून अमळनेर येथे आर एम बी के एस ‘प्रोटान’च्या वतीने ज्येष्ठ मार्गदर्शक नानासाहेब शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. यातील प्रमुख मागण्या:- १)जुनी पेन्शन लागू करणे, २)राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० रद्द करणे ३) नवीन कामगार कायदे कर्मचाऱ्यांना गुलाम बनवणारे असल्यामुळे पूर्वीचे कामगार कायदे कायम ठेवणे, ४) सरकारी उद्योगाचे खाजगीकरण थांबवावे व इतर मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. ‘प्रोटान’ जिल्हा महासचिव मिलिंद निकम, जिल्हा उपाध्यक्ष सोपान भवरे, तालुकाध्यक्ष डी ए सोनवणे यांनी निवेदन दिले. याप्रसंगी अनिल संदानशिव, अविनाश पवार, फईम पिंजारी, समता शिक्षक परिषद प्राथ. जिल्हाध्यक्ष अजय भामरे, मुख्याध्यापक संघ तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, पत्रकार वसंतराव पाटील, नूरखान पठाण, आत्माराम अहिरे हे उपस्थित होते.

