जुन्या पेन्शनसाठी उदयाच्या संपासाठी अमळनेरला विविध संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार, बीडीओ, गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन..
![]()


जुन्या पेन्शनसाठी उदयाच्या संपासाठी अमळनेरला विविध संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार, बीडीओ, गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन..
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर प्रांत, तहसील कार्यालय समोर विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी “जुनी पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” या घोषणेने सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे लक्ष वेधले.
टीडीएफ संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष संदीप घोरपडे, यांनी घोषणा दिल्या व त्यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
1 नोव्हेंबर 2005 रोजी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदान आलेले कर्मचारी व 2005 नंतरचे सर्व कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे या मागणीसाठी 14 मार्च 2023 पासून बेमुदत संप केला जाणार आहे. या संपात विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देत सक्रिय सहभागी होणार आहेत.
शेजारील अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना पूर्ववत केली महाराष्ट्र सरकार या कर्मचाऱ्यांच्या रास्त मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत राज्यातील कर्मचाऱ्यांचा शासनावरील विश्वास उडत जाऊन शासनाविषयी प्रचंड रोष आहे तरी शासनाने त्वरित सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लावी अशी मागणी निवेदनात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये निवेदन देण्यात आले.
यावेळी जुनी पेन्शन संघटनेचे नाशिक विभागाचे डाँ कुणाल पवार, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील ,माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तुषार पाटील,मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाअध्यक्ष एम.ए पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, शिक्षक भारतीचे आर.जे पाटील ,राहुल पाटील, पेंशन संघर्ष संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभुदास पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशिल भदाणे,
प्रहार संघटनेचे सुधीर चौधरी, ग्रामसेवक संघटनेचे ज्ञानेश्वर साळुंखे व संघटनेचे पदाधिकारी, क्रीडा संघटनेचे अध्यक्ष एस पी वाघ, महेंद्र रामेशे,आशिष पवार ,निलेश विसपुते, दीपक पाटील ,जितेंद्र करंदीकर ,विकास चौधरी ,समाधान पाटील ,दीपक महाजन ,मुकेश पाटील, स्वप्निल पाटील, मुख्याध्यापक संजय पाटील,अनिल महाजन, एच.ओ.माळी,एस.के.महाजन, एन.जी.देशमुख, दीपक सोनवणे, यशोदा महाले, राहुल पाटील, रोहित तेले, उमाकांत हिरे, जगदीश पाटील, पाकीजा चौधरी, दिपाली पवार, रूपाली पवार, ललिता गवळी,मनिषा गवते, मनीषा पाटील, गायत्री पाटील, योगिता साळुंखे, योगिता वाघ, मधुकर चौधरी ,संजय पाटील, मकरंद निळे, कैलास पाटील, भिकन पाटील सह अनेक शिक्षक शिक्षिका व विविध कर्मचारी उपस्थित होते.


