1 min read

जुन्या पेन्शन संदर्भात संप न करता विचार विनिमय करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन निर्णय समितीद्वारे सकारात्मक निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शासकीय संघटनांची बैठक संपन्न.

Loading

जुन्या पेन्शन संदर्भात संप न करता विचार विनिमय करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन निर्णय समितीद्वारे सकारात्मक निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शासकीय संघटनांची बैठक संपन्न. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा विनंतीचा आदर करावा :: आ.ज्ञानेश्वर म्हात्रे ठाणे(मनिलाल शिंपी). जुन्या पेन्शन संदर्भात आज माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब. तसेच उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अधिकाऱ्यांसमवेत व शासकीय संघटनांसोबत आज बैठक घेतली बैठकीत ठरलेले माहिती देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलवून घेतले , आपण सर्व संघटनांची बैठक घेणार आहोत त्याची समिती सुद्धा गठित करण्यात आलेली आहे, जुन्या पेन्शन संदर्भात आपण सकारात्मक आहोत, बैठक घेऊन आपण सर्वांची मतं जाणून घेऊ, सर्वांसाठी आपण चांगला निर्णय घेऊ , दहावी बारावीच्या परीक्षा सुरू आहेत ,शिक्षकांनी संप करू नये, अशी विनंती त्यांनी केलेली आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या विनंतीचा आदर राखुया
होणाऱ्या बैठकीमध्ये आपण आपले मत निश्चितपणे व्यक्त करून आपण आपल्या हक्काची पेन्शन मिळवू या!
असे आव्हान शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले आहे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *