उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी नुकतीच सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ.निलेश चांडक जळगांव यांची घेतली सदिच्छा भेट
![]()

उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी नुकतीच सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ.निलेश चांडक जळगाव यांची घेतली सदिच्छा भेट
जळगाव जिल्ह्यातील एकमेव चांडक कॅन्सर हॉस्पिटल जळगाव येथे डॉ. निलेश चांडक यांची नुकतीच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर तसेच फाउंडेशनचे जळगाव जिल्हा समन्वयक पत्रकार श्री राजेश पोतदार यांनी सदिच्छा भेट घेतली याप्रसंगी डॉ. निलेश चांडक यांनी त्यांच्या हॉस्पिटलचा पूर्ण परिसर, रुग्ण सेवा वार्ड ऑपरेशन थिएटर्, एक्स-रे सेंटर आणि असंख्य वृक्ष लागवड त्यांनी केलेली आहे ते सुद्धा त्यांनी विस्तृत माहिती देऊन प्रत्यक्ष दाखवली व रुग्णांना जळगाव जिल्ह्यामध्ये एकमेव असे हे कॅन्सर हॉस्पिटल असल्याने डॉ.निलेश चांडक हे सदैव व्यस्त असतात तरीसुद्धा त्यांनी डॉ. उज्जैनकर यांना वेळ देऊन पाऊण तास त्यांनी सर्व परिसर दाखवून हॉस्पिटलची माहिती दिली. पाच वर्षांपूर्वी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजसेवेचा पुरस्कार डॉ. चांडक यांना प्रदान करण्यात आलेला होता ते एक सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ असून असंख्य रुग्णांना त्यांनी जीवदान दिलेले आहे.

