डॉ.पाकीजा पटेल यांना राष्ट्रीय पुरस्कार, पुरस्काराची हॅट्रिक
![]()


डॉ.पाकीजा पटेल यांना राष्ट्रीय पुरस्कार पुरस्काराची हॅट्रिक
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श मुख्याध्यापिका डॉ. पाकीजा उस्मान पटेल यांना नाशिक येथे मासाहेब जिजाऊ राष्ट्रीय पुरस्कार मा. नयना ताई मुंडे आदिवासी विकास आयुक्त यांच्या हस्ते व धुळे येथे आमदार फारुक शहा यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच जळगाव येथील जिल्हाधिकारी अल्पबचत भवन कार्यक्रमात मा . आमदार राजू मामा भोडे यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. नुकताच त्यांनी हिरकणी फाउंडेशन पुणे कडून विद्यार्थ्यांना स्पोर्टड्रेस चा लाभ मिळवून दिला . विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्या सदैव झटत असतात. शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण इत्यादी क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट व मोलाची कामगिरी केल्याने त्यांना पुरस्कार देण्यात आला. आतापर्यंत पटेल यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

