१४ मार्चचा जुनी पेंशनचा संप यशस्वी करा-
संदीप घोरपडे
विविध संघटनेचे पदाधिकारी होते उपस्थित…
![]()

१४ मार्चचा जुनी पेंशनचा संप यशस्वी करा
संदीप घोरपडे
विविध संघटनेचे पदाधिकारी होते उपस्थित…
अमळनेर प्रतिनिधी- 14 मार्चच्या जुनी पेन्शनच्या संपाबाबत संप तीव्र करण्यासाठी सर्व संघटनेच्या पदाधिकारी व शिक्षक बंधू व भगिनी यांची अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी शाळेत सहविचार सभा संपन्न झाली…
राज्य कार्यध्यक्ष जुनी पेंशन संघटनेचे डॉ कुणाल पवार यांनी प्रस्ताविक केले.व्यासपीठावर टीडीएफ चे राज्य कोषाध्यक्ष संदीप घोरपडे, मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील,माजी तालुकाध्यक्ष एम.ए.पाटील होते.
संपूर्ण देशात जुनी पेन्शनसाठी सर्व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. जुनी पेन्शन हा अत्यंत कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, कर्मचाऱ्यांना पेन्शन नसल्यामुळे त्यांचे सध्या परिवारांवर काय संकट कोसळले आहे याची जाणीव आहेच पण जुनी पेन्शन साठी इतर राज्यांमध्ये ती लागू केलेली आहे महाराष्ट्रामध्ये ती लागून असल्यामुळे एकच मागणीसाठी संपूर्ण संघटना 14 मार्चला मोठा संप करणार आहे यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन हा संप यशस्वी करावा असे आवाहन
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे संचालक तुषार पाटील, प्रहार संघटनेचे सुधीर चौधरी, ग्रामसेवक सैदाणे, ग्रामसेवक सैदाणे आप्पा, क्रीडा संघटनेचे एस.पी वाघ, जुनी पेन्शन संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष प्रभुदास पाटील, आशिष पवार यांनी मनोगत व आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतातून टीडीएफचे संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष संदीप घोरपडे यांनी आपल्या मनोगत सांगितले की देशात अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना स्वीकारली गेली. कारण त्या राज्यांमध्ये आंदोलन तेवढीच तीव्र झाली. महाराष्ट्रात जुनी पेन्शनसाठी काही संघटना आंदोलन करीत आहेत. पण यावेळेस राज्यातील सर्व संघटना एकाच मुद्द्यावर 14 मार्चपासून संप करणार आहेत. त्यामुळे सर्व कर्मचारी व विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी हा संप 100% यशस्वी करून शासनाला दाखवून द्यावे. महाराष्ट्रात जेव्हा आंदोलन तीव्र होईल तेव्हा शासनाला जुनी पेन्शन योजना दयावीच लागेल यासाठी गटतट विसरून सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित लढा देणे गरजेचे आहे. उद्या 4 वाजता अमळनेर प्रांत अधिकारी व तहसील कार्यालयात निवेदन द्यायचे आहे तर जास्तीत जास्त कर्मचारी यांनी उपस्थित रहावे अशी सांगितले.
सहविचार सभेचे सूत्रसंचालन टीडीएफ संघटनेचे सुशील भदाने यांनी केले.तर आभार प्रदर्शन शरद पाटील यांनी मानले. यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.






