1 min read

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या कामाचा धुमधडाका

Loading

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या कामाचा धुमधडाका

मुंबई ठाणे विभागीय प्रतिनिधी ( मनिलाल शिंपी ) ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांची मुख्याध्यापक, शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक दिवसापासून प्रलंबित असली कामे सोडवण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत समस्या घेऊन आल्या शिक्षकांच्या उपस्थितीत बैठक झाली* *सुमारे 200 शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी आपल्या शैक्षणिक समस्या घेऊन आलेल्या होत्या, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी सर्वांच्या समस्या समजून घेतल्या , अनुदानासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पडताळणी कॅम्प बाबत, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्रलंबी शिक्षक शिक्षकेतर तसेचच अनुकंप मान्यता, फरक दिले, मेडिकल बिल, पीएफ ना परतावा, संच मान्यता, शालार्थ आयडी, आर टी इ पुनर्मान्यता , इत्यादी विषयाबाबती समस्या सोडवण्यासाठी उपस्थित जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या* *आमच्या हक्काचा आणि शिक्षकांसाठी सदैव राबणारा आमदार आम्हाला मिळाला म्हणून अनेक शिक्षकांनी सरांचे अभिनंदन केले व आनंद व्यक्त केला* *लवकरच पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , जिल्ह्यामध्ये प्रलंबित कामासंबंधी , अधिवेशन संपल्यानंतर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर दौरा करणार आहेत, तोपर्यंत प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या तालुक्यातील कामे समस्याग्रस्त शिक्षक- शिक्षकेतर, शाळांचे निवेदन घेऊन कामाची यादी तयार करून ठेवावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *