शिवनगरी संकुल सोसायटी मोहने येथे होळी उत्सव उत्साहात साजरा .
![]()

शिवनगरी संकुल सोसायटी मोहने येथे होळी उत्सव उत्साहात साजरा .
ठाणे कल्याण ( प्रतिनिधी ):कल्याण तालुक्यातील आंबिवली मोहने येथील शिवनगरी संकुल सोसायटीमध्ये भारतीय संस्कृतीनुसार, एकात्मतेचे खेळीमेळीच्या, आनंदमयी वातावरणात सोसायटीचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सुक्रे, खजिनदार धनंजय घिवारे,ज्येष्ठ नागरिक यादव काका, निवृत्ती सावकारे, महिला मंडळ यांचे विशेष उपस्थितीत होळी उत्सव पूजन करण्यात आले.यावेळी सोसायटीचे खजिनदार सचिन देवगिरीकर यांनी सपत्नीक होळी मातेचे पूजन केले, तसेच सर्व भगिनींनी आपल्या घरून पुरणपोळी चां नैवेद्य दाखवून मनोभावे प्रार्थना करत होळी उत्सव पूजन करण्याचा आनंद घेतला.सोसायटी मधील सर्व बंधू-भगिनी आणि बालगोपाळ यांच्या उपस्थितीत मनोभावे होळीदेवतेचे पूजन करून सोसायटीमधील अरिष्ट, दुःख निवारण करून सोसायटीमधील सर्व बंधू भगिनी बालगोपालांचे आरोग्य शिक्षण उद्योगधंद्यात भरभराटी येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना करून, आरती द्वारे सर्वांनी वंदन केले व स्नेह नैवेद्य दाखवून होली उत्सवाच्या आनंद घेतला, भगिनींनी शेवटी हळकुंकाने समारोप केला.होळी उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी राजेंद्र लोकरे, वैभव खुराडे, पुखराज राठोड, योगेश मोरे, राजन पाटील, प्रदीप शिंगटे,गणेश बढेकर, सागर झोडगे, नरेश पटेल,संदेश चौधरी, शैलेश वाघमारे, यांच्यासह सर्व हितचिंतक बंधू भगिनी यांनी विशेष सहकार्य केले, सोसायटीचे अध्यक्ष मनिलाल शिंपी यांनी सर्व बंधू भगिनी आणि बाल गोपाळ यांचा कडून सर्वांना सुख समृध्दी ,आरोग्य, लाभू दे, आणि सर्वांचे दुःख आज तुझा अग्नी मध्ये सामावून दुर्घेन जा अशी मनोभावे प्रार्थना करून,भक्तिभावाने आरती करून यथासांग पूजा करून घेतली, शेवटी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.

