डोंबिवली येथील टिळकनगर विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन.
![]()


डोंबिवली येथील टिळकनगर विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन.
मुंबई ,ठाणे( मनिलाल शिंपी): ८ मार्च रोजी टिळकनगर विद्या मंदिर या शालेच्या सकाळ सत्रातील स्काऊट- गाईड पथकाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. सकाळ विभागातील पर्यवेक्षक नामदेव चौधरी यांच्यासह सकाळ सत्रातील नवदुर्गा म्हणजेच नऊ सहाय्यक शिक्षिका व्यासपीठावर विराजमान झालेल्या होत्या. पुरुष शिक्षकांच्या वतीने महिला शिक्षिका यांना अल्पशी भेट वस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. भेटवस्तूसोबत सोनचाफ्याची फुले ओंजळीत टाकण्यामागे उद्देश होता की, ज्याप्रमाणे सोनचाफा स्वतःचा सुगंध सर्वत्र दरवळत ठेवतो, तशाप्रकारे आमच्या या भगिनींनी शाळा, संसार, समाज अशा विविध ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध सदैव दरवळत ठेवावा.
या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी वर्गांनीही शब्दसुमनांनी महिला वर्गांचे कौतुक केले, त्यांच्या कार्याची महानता आणि कार्याचा गौरव करून शुभेच्छा बहाल केल्या. पर्यवेक्षक श्री चौधरी सर यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अर्णव मराठे, अथर्व नेवेवाणी , आर्या जोगळेकर, चिन्मयी परब , कौमुदी शितोळे या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून राजमाता जिजाऊ ते आधुनिक स्त्रियांच्या कर्तुत्वाचा गौरव केला. निधी रासने आणि दीपिका कांबळे यांनी काव्यवाचन करून महिला वर्गाला प्रोत्साहित केले, आदिती शेंबेकर हिने उत्तम भरत नाट्यम सादर करून कलेच्या क्षेत्रातील स्त्रियांच्या कार्याचा ठसा उमटवला. स्वरदा मयेकर हिने आजच्या जमान्यात स्त्रियांनी स्वसंरक्षण कसे करावे यासंबंधी कराटेची प्रात्यक्षिके सादर केली. याचबरोबर आम्ही सावित्रीच्या लेकी या सदरातील वेशभूषा करून अमृता महाबळेश्वरकर डॉक्टर, तृषाली भावसार आर्मी ऑफिसर , स्वरदा मळेकर कराटे चॅम्पियन, पोलिस अधिकारी, इत्यादी भूमिका साकारून आम्ही सावित्रीच्या लेकी कशा हे पटवून दिले. कार्यक्रमात सकाळ विभागातील आर एस पी छात्रसैनिक म्हणून कर्तव्य करणाऱ्या मुलींनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. छात्र कोणताही असो मग तो एनसीसी, स्काऊट गाईड, आर एस पी अथवा होमगार्ड सदैव देशसेवेसाठी ,आमचे जीवन सेवेसाठी हे ब्रीद वाक्य,मनाशी ठेऊन नेहमीच तत्पर असतो. याची प्रचिती कार्यक्रमाचे आयोजन नियोजनावरून समोर आले. कारण कालच्या फक्त एक दिवसात शिक्षकांनी साधलेले मोबाईल वरून संपर्क आणि केलेल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट उल्लेखनीय असे कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
मुख्याध्यापिका रंजना चंद्रमोरे आणि उपमुख्याध्यापिका सौ मुग्धा साळुंखे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान अश्या रणरागिनिंविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच स्काऊट मास्टर सचिन हमरे, हिरामण अहिरे,आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
टिळकनगर हायस्कूल चे पर्यवेक्षक नामदेव चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत मुलींनी खेळात सहभागी होऊन, आणि सोशल मीडिया विषयी जनजागृती करावी असे मार्गदर्शन करताना सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाईड कॅप्टन लीना ठाकूर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्काऊट मास्टर संदीप तांबे यांनी केले.स्काऊट गाईड छात्रांनी तयार केलेल्या घोषवाक्यांनी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

