जागतिक महिला दिन भगिनी मंडळ शाळेत उत्साहात साजरा, आदर्श शिक्षिका यांचा संस्थेतर्फे व शाळेच्या माध्यमातून झाला सत्कार
![]()

जागतिक महिला दिन भगिनी मंडळ शाळेत उत्साहात साजरा
अमळनेर प्रतिनिधी
भगिनी मंडळाचे आदर्श प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भगिनी मंडळ संस्थेचे अध्यक्षा सौ सरोज ताई भांडारकर यांनी स्वीकारले. तसेच भगिनी मंडळ संस्थेच्या उपाध्यक्ष सौ मंगलाताई पाटील, सेक्रेटरी सौ अनुरूपा ताई भांडारकर , शाळा समिती सेक्रेटरी वनश्रीताई अमृतकर, सहसेक्रेटरी सौ उज्वलाताई शिरोडे , सदस्या लीलाताई राणे, मुख्याध्यापिका सौ मंगला सोनवणे, इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. नऊ विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिना विषयी भाषणे दिली. काही विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगला सोनवणे यांनी जीवनात आपण कसे असावे हे गोष्टीनुरुप विद्यार्थ्यांना सांगितले. सौ विजया गायकवाड यांनी महिलांविषयी आदर कसा करावा हे सागितले. सौ शुभांगी कुलकर्णी यांनी महिलांविषयी चे महत्व पटवून दिले. श्रीमती मनीषा गवते यांनी जागतिक महिला दिनानिमित्त गीत सादर केले. सौ रुपाली पवार यांनी कवितेतून महिलांची व्यथा व्यक्त केली.
सौ विजया गायकवाड व श्रीमती ज्योतिर्मयी बाविस्कर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेकडून व शाळेकडून यांचा सत्कार करण्यात आला.भगिनी मंडळ संस्थेच्या सेक्रेटरी अनुरुपाताई यांनी विद्यार्थ्यांना गोष्टी रूप महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले. सहसेक्रेटरी उज्वलाताई शिरोडे यांनी आई विषयी कविता सादर केली .भाषणे दिलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. दिवंगत सौ अलका कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ बाबा कुलकर्णी यांनी बालवाडी चे सर्व विद्यार्थी व आदर्श प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्यातर्फे खाऊ वाटप केला. यांच्या स्मरणार्थ सर्व महिलांना गजरे वाटप केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योतिर्मयी बाविस्कर यांनी केले.

