समाजसुधारकांचे विचार मस्तकात गेल्याशिवाय समाज सशक्त होणार नाही
![]()
समाजसुधारकांचे विचार मस्तकात गेल्याशिवाय समाज सशक्त होणार नाही
मौर्य क्रांती संघ मंगरुळ शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बन्सीलाल भागवत सर यांचे प्रतिपादन

मंगरुळ ता.अमळनेर- मंगरूळ तालुका अमळनेर येथे मौर्यक्रांती संघाच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले. मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य अण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांनी या प्रसंगी समाज एकत्रित आल्याने प्रगती होते. एकीच्या प्रगतीत यशस्वीता अवलंबून असते. समाजाने शिक्षण व उद्योग याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.महाराष्ट्रात घराघरात सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, राजे मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व यशवंतराव होळकर यांचे विचार मस्तकात गेल्याशिवाय समाज सशक्त होणार नाही. यासाठी व्याख्यानेच्या आयोजन करण्यात येईल असे आवाहन याप्रसंगी केले.कार्यक्रमाच्या सुरवातीला पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच मौर्य क्रांती संघ शाखेच्या फलकाचे उद्घाटन मौर्य क्रांती संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र लाळगे व मंगरूळ गावाच्या सरपंच सौ. हर्षदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .तसेच मौर्यकांती संघाचे जिल्हाध्यक्ष नानासो रवींद्र लाळगे यांनी संघटनेचे महत्त्व व समाजाची प्रगती कशी होईल याविषयी मार्गदर्शन केले .यावेळी धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते आबासाहेब हरचंद लांडगे, राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे सचिव एस. सी. तेले सर ,मौर्य क्रांती संघाचे उपजिल्हाध्यक्ष आर .सी. भालेराव, मौर्य क्रांती संघाचे चोपडा तालुकाध्यक्ष डी एस धनगर , मौर्य क्रांती संघाचे अमळनेर तालुकाध्यक्ष दादासो गोपीचंद शिरसाट व सेवानिवृत्त नायब तहसीलदार सुरेश पारखे साहेब यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्कूल बोर्डाचे चेअरमन आबासाहेब नितीन निळे ,मौर्य क्रांती संघाचे उपजिल्हाध्यक्ष रमेश देव शिरसाठ, निंभोरा मा.उपसरपंच समाधान भाऊ धनगर, धनगर समाजाचे अध्यक्ष आबासो मच्छिंद्र लांडगे, युवा मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख देवा भाऊ लांडगे ,धानोरा सरपंच नानासो दिलीप ठाकरे, शशिकांत आढावे सर, संतोष भडांगे सर , प्राध्यापक संदीप पाटील, चोपडाई कोंढावळ सरपंच सुनील मासुळे,भाऊलाल पाटील होते .कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाखाप्रमुख विकास सूर्यवंशी यांनी केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनगर समाजाचे अभ्यासू व्यक्तीमत्व व राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे कार्यध्यक्ष डी ए धनगर सर व अमोल पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन दिलीप धनुरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी साठी अमोल कोकदे, सुरेश धनुरे, सुनील धनुरे ,गुलाब शेवरे, बापू कोकदे ,भीमराव कोकदे,जगदीश कोकदे गुलाब धनुरे ,वसंत धनुरे, प्रताप शेवरे, भिला चव्हाण, साई धनुरे,विनोद धनुरे ,मच्छिंद्र कचवे ,उत्तम भगुरे ,भाऊसाहेब धनुरे,शरद कोकदे, सुभाष कोकदे, अनिल धनुरे, उमेश कचवे इत्यादींनी परिश्रम घेतले.

