1 min read

भैरवनाथ शिक्षण संस्थेचे शिक्षक गणेश कदम यांनी जागृती कदम या मुलीचा वाढदिवस सामाजिक कार्य करुन साजरा केला…

Loading

भैरवनाथ शिक्षण संस्थेचे शिक्षक गणेश कदम सर यांनी जागृती कदम या मुलीचा वाढदिवस सामाजिक कार्य करुन साजरा केला

बार्शी- भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी या शाळेत शिक्षक गणेश कदम सर हे आपल्या दोन्ही मूलींचे वाढदिवस दरवर्षी सामाजिक कार्य करत असतात. या वर्षी 22 फेब्रुवारी या दिवशी जागृती गणेश कदम हिचा वाढदिवस असतो. यांनी डाॅ राधाकृष्ण नगरपालिका शाळा क्र १८ या शाळेतील मुलांना शालेय साहीत्य आणी खाऊ वाटप केला. संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदीर बार्शी या शाळेतील इ ४ थी वर्गातील मुलांना शाळेची ओढ रहावी आणी शाळेतील मुलगा शालेय साहीत्यापासुन वंचीत राहु नये म्हनुन परीक्षेसाठी लागणारे २३ पॅड दिले. तसेच तिच्या बालवाडी वर्गात एक घड्याळ दिले. दरवर्षी असे कार्य न चुकता करतात. या सोबत ते बार्शी शहरात सामाजिक कार्य करत असलेल्या संस्था ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्था बार्शी, वृक्ष सवंर्धन समिती बार्शी, जाणिव फाउंडेशन बार्शी या ठिकाणी निधी देवुन समाजकार्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करतात.अशा समाजकार्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिक संगीता गणगले मॅडम तसेच ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष राहुल वाणी व सहसचिव नागनाथ सोनवणे यांची खुप मदत होत असते असे त्यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *