जागतिक महिला दिनानिमित्त दोन शब्द…,उपक्रमशील शिक्षिका ताईसो वसुंधरा दशरथ लांडगे…
![]()

जागतिक महिला दिनानिमित्त दोन शब्द…
उपक्रमशील शिक्षिका ताईसो वसुंधरा दशरथ लांडगे…
पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर शाळेच्या उपक्रम शिक्षिका ताईसौ वसुंधरा दशरथ लांडगे यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे. आम्हाला सार्थ अभिमान आहे, तुमच्यासारख्या खडतर प्रसंगातून राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विचारावर चालून साने गुरुजींच्या प्रेरणेतून नीती मूल्यांचे शिक्षण मुलांना व विद्यार्थ्यांना देऊन जीवन सार्थकी लावले. अशा खडतर परिस्थितीतून आपण आपल्या मुलींना शिक्षणाचे योग्य बाळकडू देऊन त्यांना योग्य संस्कार देऊन उच्चशिक्षित केले तसेच असंख्य संकटे बाजूला करणाऱ्या, परिस्थितीला विवेकाने उत्तर देणा-या आमच्या ताईस जागतिक महिला दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा…!
आपल्या शैक्षणिक व सामाजिक घोडदौडमध्ये आमचे नानासो दशरथ सोमा लांडगे सावलीसारखे उभे राहतात .याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मुली व जावई अत्यंत मितभाषी व प्रेमळ असं कुटुंब आपणास मिळालेले आहे.
आतापर्यंत आपण शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करीत असतांना अनेक पद भूषवित आहात… व अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले आहात…
आपले आदर्श आम्हा लोकांना सदैव प्रेरणा देतील.. आपणास पुढेही निर्मिक आनंदी जीवन व निरामय स्वास्थ्य लाभो. या जागतिक महिला दिनानिमित्त मी ,माझ्या परिवाराकडून मराठी लाईव्ह न्युज कडून आपणास आभाळभर शुभेच्छा !.
हजारो फुल हवेत
एक माळा बनवण्यासाठी
हजारो दीपक हवेत एक
आरती सजवण्यासाठी
हजारो थेंब हवेत एक
समुद्र बनवण्यासाठी
परंतु एक स्त्रीच पुरेशी आहे
घराला स्वर्ग बनवण्यासाठी.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
शब्दसंकलन
ईश्वर आर महाजन पत्रकार अमळनेर

