जागतिक महिला दिनानिमित्ताने दोन शब्द….
साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती अनिताताई बोरसे ….
![]()

जागतिक महिला दिनानिमित्ताने दोन शब्द….
साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती अनिताताई बोरसे ….
सानेगुरुजी कन्या हायस्कूलच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका ताईसाहेब श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य वाखाण्याजोगे आहे..
तुमच्यासारख्या खडतर प्रसंगातून राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर चालून व पूज्य साने गुरुजींच्या प्रेरणेतून नितीमूल्यांचे शिक्षण मुलांना व विद्यार्थ्यांना देऊन जीवन सार्थकी लावले.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अशा संकटातून आपल्या मुलांना शिक्षणाचे योग्य बाळकडू देऊन त्यांना योग्य संस्कार देऊन उच्च विद्याविभूषित केले. तसेच असंख्य संकटे बाजूला करणाऱ्या, परिस्थितीला विवेकाने उत्तर देणा-या आमच्या ताईस जागतिक महिला दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
आपल्या जीवनसाथीची अर्ध्यावर साथ सुटल्यानंतर शून्यातून विश्व उभारण्याची आपली गगन भरारी अतुलनीय आहे. तुम्ही दिलेल्या अनमोल संस्कारांनी शोषण व ज्ञानाने अनेक वाटसरू तृप्त झाले. त्यांच्या अभिवादनाने ऊर भरून येत असेल….. आणि आठवत असेल तो प्रसंग जेव्हा संकटांची दालने हळूहळू नेस्तनाबूत केली ती कायमची!
आपणास मनापासून सलाम !
आपल्या आदर्शाची आम्हा लोकांना सदैव प्रेरणा मिळेल. आपणास पुढेही निर्मिक आनंदी जीवन व निरामय स्वास्थ लाभो. जागतिक महिला दिनानिमित्ताने मी , माझ्या परिवाराकडून व मराठी लाईव्ह न्युज कडून आपणास आभाळभर शुभेच्छा….!
हजारो फुल हवेत
एक माळा बनवण्यासाठी
हजारो दीपक हवेत एक
आरती सजवण्यासाठी
हजारो थेंब हवेत एक
समुद्र बनवण्यासाठी
परंतु एक स्त्रीच पुरेशी आहे
घराला स्वर्ग बनवण्यासाठी.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
शब्दसंकलन
ईश्वर महाजन पत्रकार अमळनेर
9860352960

