1 min read

जागतिक महिला दिनानिमित्त…संत गजानन महाराजांच्या निस्सीम भक्त ज्योतीताई राजेंद्र पवार

Loading

जागतिक महिला दिनानिमित्त…

संत गजानन महाराजांच्या निस्सीम भक्त ज्योतीताई राजेंद्र पवार

कोणतेही कार्य करत असतांना मनात आत्मविश्वास, जिद्द व परमेश्वरावर निस्सिम भक्ती असेल तर कोणतीही कार्य तळीस जाऊ शकते असेच अमळनेर येथील दादासाहेब सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरातील महिला वारकरी प्रमुख ज्योतीताई राजेंद्र पवार यांनी ते सिद्ध करून दाखवले आहे. ताई हया संत गजानन महाराजांच्या निस्सीम भक्त आहेत .त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातील अभ्यास वाखाण्याजोगा आहे. ताईंना त्यांचे पती पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे माजी सभापती व संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष आप्पासाहेब प्रा .आर .बी पवार यांचा भक्कम पाठिंबा असल्याने ताईंनी महिला वर्गांचा गोतावळा निर्माण केला आहे. कुठेही ग्रामीण असो शहरी भागात असो संत गजानन महाराजांच्या सत्संगात संत गजानन महाराजांचा महिला परिवार उपस्थित असतो.त्याच्यात अध्यात्मिक शक्ती नसानसात भरलेली आहे.
ताई अत्यंत मितभाषी व सगळ्यांना अध्यात्मिक क्षेत्राचे धडे देत असतात.अनेक महिला संत गजानन महाराजांच्या परिवारात सामील झाल्या आहेत. संत गजानन महाराज मंदिर आपल्या परिसरात असले पाहिजे असे प्रा.पवार सर व ताईसाहेब यांना वाटत होते. त्यांनी अनेक सामाजिक दातृत्व देणारे राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील लोकांचे योगदान घेतले. व गजानन परीवारातील महिला यांना बरोबर घेऊन त्यांच्या मनातली इच्छा आज फळ रुपात आली आहे. आज अमळनेर शहरात दादासाहेब सोनार नगर मध्ये प्रति शेगाव म्हणून संत गजानन महाराजांचे मंदिर नावारूपास आले आहे. संत गजानन महाराज सेवा संस्थांन व गजानन परिवाराच्यावतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवल्या जातात. अनेक दातृत्ववान व्यक्ती सढळ हाताने मदत करतात. ज्योतीताई अत्यंत प्रेमळ व सर्वांना आपलंसं करणा-या आहेत. ताईंचा संपूर्ण परिवार संत गजानन महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. मुलगा मोहित हा आपल्या आई-वडिलांच्या विचारांवर चालणारा आदर्श मुलगा आहे. तर
मुलीने वकिली व्यवसायात आपले करिअर केले आहे. व जावाईबापू पण मितभाषी आहेत.
स्त्री-पुरुष दोघांचा समान सहभाग असला तरच वारकरी संप्रदायाची समृद्धी होईल हे ज्या वेळी
वारकऱ्यांच्या मनात बिंबवले जाईल, तेव्हाच पुरुष वारकऱ्यांच्या जोडीने महिला वारकरी दिंडीत
वीणेकऱ्यांच्या बरोबर नाचतील, गातील, भाकऱ्या थापणारे हात निरूपणासाठी उठतील आणि
हरिनाम घेणारे सर्वच समान पातळीवर असतील.बाहेर पडावं, स्वतःच अस्तिव सिद्ध करावं, या जाणिवेतून महिला मंडळाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांची निर्मिती ज्योतीताईंच्या माध्यमातून करण्यात आली कालांतराने महिला भक्तांच्या सेवाकार्य उपक्रमात सहभाग वाढला .या सहभागामुळे महिला भगिनींची स्वतंत्र दिंडीला सन २०१८ पासून सुरवात झाली. या दिंडीला उत्तम
प्रतिसाद लाभला सुरवातीलाच निघालेल्या दिंडीत तालुक्यातील २०० हुन अधिक महिलांनी सहभाग
घेतला.विदर्भयोगी
संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दरवर्षी अमळनेर येथून महिला दिंडीचे (वारीचे)
आयोजन करणाऱ्या सौ ज्योती राजेंद्र पवार यांच्या वाटचालीवर महिला दिनाच्या निमित्ताने टाकलेला
हा प्रकाशझोत…..

कौटुंबिक पाश्र्वभूमी
माहेर निमझरी ता. अमळनेर येथील तर सासर
चांदसर, ता.धरणगावचे. पती राजेंद्र पवार, मुलगा
मोहित, सुनबाई किरण, मुलगी अँड. प्रियंका,

कार्याला सुरवात
कार्याचा श्री गणेशा
ज्योतीताईंचे पती राजेंद्र पवार हे निवृत्त शिक्षक सुरवाती पासूनच घरात श्री गजानन महाराजांची
उपासना होत असे या कुटुंबाचे सदस्य झाल्यानंतर ज्योतीताईंनी देखील महाराजांच्या सेवेत सहभाग
घेतला सन २०१३ दरम्यान राजेंद्र पवार यांनी अमळनेर शेगाव पायी दिंडीची सुरवात केली.महिलांनी चूल आणि मूल यातून बाहेर पडले पाहिजे व आपले कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे ते ताईसाहेब यांनी सिध्द करून दाखवले.

पथदर्शी वाटचाल
दिंडीचा ९ दिवसांचा कालावधी हा महिलाभगिनींच्या क्षमता विकासाला चालना देणारा ठरतो.
दर दिवसाचे नियोजनबद्ध वेळापत्रक हे आधीच तयार असते यात सकाळी उठल्यापासून काकड
आरती, दुपारी संत्सग पाद्यपूजा, चहापान, न्याहरी,
भोजन आदींचे उत्तम नियोजन करण्यात येते.
इतकेच नव्हते तर महिला भाविकांच्या औषधी इतर आवश्यक बाबींची देखील विशेष काळजी
घेतली जाते सर्वधर्म समभावाचे उत्तम उदाहरण असलेली हि महिला दिंडीने जात, पात आदींच्या
पलीकडील आपुलकीचं कुटुंब निर्माण केले आहे.सहभागी होणाऱ्या प्रत्येक भगिनींच्या भावनांना
समजून घेत, विविध भजन गायन, फुगडी बाबींमध्ये प्रत्येकीला सहभागी करून घेतल्याने
प्रत्येक महिला भगिनींचा आत्मविश्वास वाढला आहे .दरवर्षी या दिंडीत सहभागी होणाऱ्या
महिलांची वाढती संख्या हे या दिंडीच्या उत्तम नियोजनाचे प्रतीक आहे.आज जागतिक महिला दिनानिमित्त ताईंच्या
उत्कृष्ट कार्याला संत गजानन महाराज त्यांना दीर्घायुष्य देवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना…

आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे,
ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि
तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.
जागतिक महिला दिनाच्या तमाम महीलांना शुभेच्छा!

शुभेच्छुक
ईश्वर आर महाजन पत्रकार अमळनेर
9860352960