अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचे त्वरित पंचनामे करा,
भाजपाचे तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील यांचे खासदारांना पत्र
![]()
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचे त्वरित पंचनामे करा
भाजपाचे तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील यांचे खासदार पाटील यांना पत्र


अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांना काही शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांनी त्वरित दखल घेऊन पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाला विनंती केली आहे.
अमळनेर तालुक्यात काल संध्याकाळी झालेल्या वादळी वारा व पाऊस ह्यामुळे सर्व महसूल मंडळ मध्ये मका व गहू पिकाचे खूप नुकसान झाले ह्याबद्दल जळगाव लोकसभा खासदार उन्मेष दादा पाटील यांना निवेदन देऊन झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामा करून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती भाजपचे तरुण व कार्यक्षम तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील यांनी केली आहे.

