आपल्या जीवनाशी रंगाचे अतूट नातं
![]()
आपल्या जीवनाशी रंगाचे अतूट नातं
मित्रांनो शिशिर ऋतू संपून वसंत ऋतुला नुकतीच सुरुवात झाली आहे. वसंत ऋतुला सर्वश्रेष्ठ ऋतू म्हणतात. या ऋतूत साऱ्या सृष्टीला नवचैतन्याचे डोहाळे लागते व निसर्ग नव्या पाना फुलातून रंग गंधाची उधळण करीत असतो.
रंगांचे आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. खूप तणावाखाली असताना झाडाचा हिरवा रंग आपला ताण हलका करतो. सूर्यकिरणांमध्ये सात रंग सामावलेले असतात सूर्यप्रकाशानेच आपल्याला ऊर्जा मिळत असल्याने या रंगाचा आपल्या जीवनावर थेट प्रभाव पडतो. उन्हामुळे त्वचेवर होणाऱ्या परिणामांपासून बचाव होण्यासाठी आपल्या त्वचेवर नैसर्गिक रंग जर लावले तर त्वचा टवटवीत राहते व आपल्या शरीरातील आयन्सला बळकटी प्रदान करते.
आपण आपल्या पूर्वजांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी होळी साजरी करण्यासाठी योग्य वेळ निवडली. ऋतू बदलत असल्याने लोक आळशी होतात आपल्या शरीरात थकवा आणि आळसाचे प्राबल्य वाढलेले असते. आपली ही सुस्ती घालवण्यासाठी व आपल्यात नवचैतन्य आणण्यासाठी होळी हा सण महत्त्वाची भूमिका बजावतो.
कल्पना करा तुमच्यासमोर फळांची प्लेट भरलेली आहेत त्यात स्ट्रॉबेरी, द्राक्षे,सफरचंद, लीची,आंबा यासारखी फळे आहेत आणि त्या फळांचा रंग फक्त काळा किंवा फक्त पांढराच आहे. तर ती आपल्याला खावीशी वाटली का?… नाही ना. कारण आवडीचा संबंध त्याच्या चवीबरोबरच रंगाशीही अतूट आहे. रंग आपल्याला आपल्या आयुष्यातून वेगळेच करता येऊ शकत नाही.
हा उत्सव फक्त आपल्यालाच ताजेतवाने करणारा नसून आपल्या नातेसंबंधांना सुद्धा बळकटी करणारा उत्सव आहे. त्यामुळे नैसर्गिक रंग खेळून आपण धुलीवंदनाचा आनंद लुटुया.
कृत्रिम रंग व त्यापासून होणारे दुष्परिणाम खाली दिलेले आहेत.
लेखक—गोपाळ महाजन
हरित सेना प्रमुख
सार्वजनिक विद्यालय असोदा.



