भडणे परिसरात अवकाळी पाऊस गहू, हरभरा, कांदा पिकाचे मोठे नुकसान
![]()
भडणे परिसरात अवकाळी पाऊस गहू, हरभरा, कांदा पिकाचे मोठे नुकसान,,,,,,,,,,,
,,,,,,,,तोंडात आलेला घास अवकाळी पावसाने,हीरावल्याने शेतकरी
कर्जबाजारी होणार,,,,,,,,,,,,,
शासनाकडून मदतीची प्रतीक्षा पंचनामासाठी शासनाने पाऊल उचलावे,,,,
भडणे परिसरात,वादळी वारे ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह गारांसह आलेल्या अवकाळी पावसाने भडणे,,परिसरातील गहू, हरभरा, ज्वारी, कांदा,मका टरबूज,दादर यासह शेतातील उभ्या पिकांना पावसाचा मोठा आर्थिक फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. काल सायंकाळी व रात्रीसाडेदहा वाजेच्या सुमारास भडणे परिसरात अवकाळी पावसाने अनपेक्षितपणे जोरदार हजेरी लावली यात वादळी वारे, त्यात जोरदार पाऊस आल्याने शेतातील व काढणी केलेली पिके झाकून ठेवण्यासाठी शेतकर्यांची एकच धांदल उडाली तर या पावसाने चिंता अधिक वाढली आहे त्याचबरोबर काढणीला आलेला हरभरा, गहू ,ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. हाताशी आलेले उत्पन्न डोळ्यात देखत अवकाळी पावसामुळे, खराब झाल्यामुळे, शेतकरी रब्बी हंगामात देखील खर्च करून देखील उत्पन्न झिरो आल्यामुळे खर्च निघणार नसल्यामुळे आर्थिक अडचणीत आहे
सुमारे अर्धा तास अधून मधून रात्रभर या अवकाळी पावसाच्या सरी,गारा व वादळा मुळे शेतातील उभ्या पिकांना मोठा फटका बसणार असून अजून दोन दिवस पावसाचे वातावरण असल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत दिसून येत आहेत. मालाला योग्य ती चकाकी नसल्यास भाव सुद्धा गडगडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे गहू, हरभरा,मका घेणारे शेतकरी हवालदिल झाला आहे, अवकाळी पावसात नुकसानग्रस्त ठरणार्या शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. कारण शेतकऱ्यांच्या पूर्ण माल,तयार झाला होता तोंडात आलेला घास या अवकाळी पावसाने हीरावुन नेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे



