उपक्रमशील शिक्षक आर.आर सोनवणे व अर्चना सोनवणे दांपत्य दर्पण पुरस्काराने सन्मानित…
![]()
उपक्रमशील शिक्षक आर.आर सोनवणे व अर्चना सोनवणे दांपत्य दर्पण पुरस्काराने सन्मानित…
अमळनेर प्रतिनिधी- भरवस माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील क्रीडा व विज्ञान शिक्षक आर आर सोनवणे व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद शाळा भिलाणे येथील
उपक्रमशील मुख्याध्यापिका अर्चना सोनवणे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत चोपडा येथे दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित कडून सोनवणे दांपत्य दर्पण पुरस्काराने सन्मानित कै .श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय ,भरवस येथील क्रीड़ा शिक्षक श्री . आर.आर.सोनवणे .व सौ अर्चना सोनवणे मुख्याध्यापिका जि.प.शाळा भिलाने यांच्या शैक्षणिक ,सामाजिक विविध उल्लेखनीय कार्याबद्दल प्रेरणा दर्पण फाउंडेशन चोपड़ा कडून मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित .मा.विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी ,मा.आमदार कैलासबापू पाटील .नगराध्यक्ष मनीषा चौधरी, के आर सोनवणे, वैशाली प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोनवणे दांपत्य यांनी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे .या अगोदरही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. वृक्ष संवर्धन, विद्यार्थ्यांना विविध क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थी तालुका जिल्हा पातळीपर्यंत मिळवण्यासाठी ती नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत. अत्यंत मितभाषी सोनवणे दांपत्य शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
त्यांच्या यशाचे अभिनंदन भरवस संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब प्रा.डॉ संजय सोनवणे व शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेचे सचिव बापूसौ विजय सोनवणे व शाळेचे शिक्षक व ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन व सर्व पदाधिकारी यांनी केले.

